मुंबई: चित्रपटसृष्टीतील रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग आपल्या दमदार संगीताने भरलेल्या गाण्यांवर चाहत्यांना नाचवतो आहे. त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे की, एक वर्षाची गर्लफ्रेंड टीना थडानी आणि हनी सिंगचे ब्रेकअप झाले आहे. त्यांच्या नातेसंबंधातून आता हनी सिंग आणि मॉडेल-अभिनेत्री टीना थडानी वेगळे झाले आहेत. यो यो हनी सिंगआणि त्याचा गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती :एकमेकांना अनफॉलो करण्यासोबतच दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत. दोघांना अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र पाहण्यात आले होते. यापूर्वी जानेवारीमध्ये यो यो हनी सिंगने दिल्लीतील एका कार्यक्रमात अभिनेत्री-मॉडेल टीना थडानीची जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती. दोघांनी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. अशा स्थितीत दोघेही एका वर्षानंतर वेगळे झाले.
ब्रेकअपचे संकेत दिले होते :दोघांच्या ब्रेकअपचा निर्णय झाल्याचे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. दोघांनाही आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. अशा वेळी दोघांनाही सावरायला थोडा वेळ लागेल. त्यांनी आता आपापल्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. यासोबतच हनी सिंगने ब्रेकअपची माहिती सर्वांना दिली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, रॅपरने हनी सिंगने ब्रेकअपचे संकेत दिले होते.
पाठीशी उभे राहिले अक्षय कुमार :हनी सिंगच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा तो संगीतापासून दूर होता. प्रसिद्धी आणि मानसिक आरोग्याशी संघर्ष करत होता. तेव्हा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला. एक नाव त्याच्या पाठीशी उभे राहिले ते म्हणजे अक्षय कुमार. एका मुलाखतीदरम्यान हनी सिंगला विचारण्यात आले की जेव्हा त्याला त्याच्या समस्या समजल्या तेव्हा इंडस्ट्रीतील कोणी त्याच्याशी संपर्क साधला. यावर त्याने उत्तर दिले की मी फोनवर बोलू शकत नाही. पण अक्षय कुमारशी 2-3 वेळा बोललो आहे.
हेही वाचा :Adipurush World Premiere : प्रभास क्रिती सॅनन स्टारर आदिपुरुषचा ट्रायबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार वर्ल्ड प्रीमियर