मुंबई - Arbaaz Khan Marriage :अभिनेता सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानची लव्ह लाईफ त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत आहे. मलायकासोबत लग्न तुटल्यानंतर त्यानं जॉर्जिया एंड्रियानीला डेट करणं सुरू केलं होतं. यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. सध्या सलमान खानचे दोन धाकटे भाऊ अरबाज खान आणि सुहेल खान घटस्फोटित जीवन जगत आहेत. आता खान कुटुंबात पुन्हा एकदा एका महिलेचा प्रवेश होणार आहे. अरबाज खान लग्न करत असल्याचं आता समजत आहे. अरबाज खानच्या आयुष्यात आणखी एका मिस्ट्री गर्लचा प्रवेश झाला आहे.
लग्नाची तारीख निश्चित? :अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे आणि ती दुसरी कोणी नसून मेकअप आर्टिस्ट शौरा खान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान त्याची कथित गर्लफ्रेंड शौरा खानसोबत 24 डिसेंबरला लग्न करणार आहे. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, खास नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. दरम्यान एका मुलाखतीत जॉर्जियानं सांगितलं होत की, ''मी मलायका आणि अरबाजच्या कुटुंबाला अनेकदा भेटले आहे. अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताही विचार नाही. लॉकडाउन संपल्यानंतर आमच्या नात्यात बदल झाला आहे. अरबाज खान आणि जॉर्जियाला एकत्र डेट करून 4 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. याशिवाय दोघांच्या वयात सुमारे 20 वर्षांचा फरक आहे.