मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याची लाडकी मुलगी सुहाना खानच्या वाढदिवसानिमित्य तिची एक सुंदर व्हिडिओ छोटी क्लिप शेअर केली. शाहरुखची छोटी राजकुमारी सुहाना खानबद्दल सुपरस्टार नेहमीच हळवा दिसला आहे. 'तू आज आणि कायमस्वरुपी आनंदीत राहावी असा आजचा दिवस आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा', असे शाहरुख खानने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे.
शाहरुखने शेअर केलेली व्हिडिओ क्लिप- सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी मुलांपैकी एक असलेल्या सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुहाना हॅरी स्टाइल्सचे गाणे वॉटरमेलन शुगर गाणे पार्श्वभागात वाजत असून त्यावर ती आइस स्केट्स घालून फिरताना दिसत आहे. काळ्या क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये ती छान दिसते.
शाहरुखच्या पोस्टला सुहानाची प्रतिक्रिया- तिच्यासाठी असलेल्या पोस्टवर सुहानानेही तत्परतेने प्रतिक्रिया दिली. सुरुवातीला, सुहानाने 'हेहेहे'सह जीभ बाहेर हसणारा इमोटिकॉन आणि हार्ट इमोटिकॉन लिहिले. काही वेळानंतर, सुहानाने पुन्हा कमेंट केली आणि वडिलांवरील आपले प्रेम व्यक्त केले. मुलीबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल चाहते शाहरुखच्या पोस्टवरकमेंट करत आहेत.