मुंबई :संजय दत्त आज २९ जुलै २०२३ रोजी ६४ वर्षाचा झाला असून तो चाहत्यांना आता एकापाठोपाठ एक आश्चर्यकारक भेट देत आहे. संजय दत्तने आज त्याच्या आगामी साऊथ 'डबल इस्मार्ट' चित्रपटमधील त्याचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथचा देखणा स्टार पोथिनेनी हा काम करणार आहे. दरम्यान त्यानंतर संजय दत्तच्या पोस्टला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान आता पुन्हा एकदा संजय दत्तने त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. संजयचा आगामी चित्रपट 'लियो'मधील फर्स्ट लूक समोर आले आहे. या चित्रपटामध्ये संजय साऊथ सुपरस्टार विजयसोबत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'लियो' चित्रपटामधील संजय दत्तचे फर्स्ट लूक रिलीज : 'लियो' या चित्रपटामध्ये संजयच्या पात्राचे नाव अँटोनी दास असणार आहे. संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त मेकर्सनी लिओचा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये संजय दत्तचा कूल लूक समोर आला आहे. लिओ दिग्दर्शक लोकेश कनकराजने ट्विटरवर संजय दत्तचा लूक शेअर करत लिहले, 'अँटोनी दासला भेटा, तुमच्या सर्वांसाठी आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे, सर तुमच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे'. असे त्याने पोस्टमध्ये लिहले. लोकेश कनकराजला चित्रपटसृष्टीत कैदी, मास्टर आणि विक्रम सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याचा 'विक्रम' हा चित्रपट २०२२ला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. हा चित्रपट लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित असून राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित होता.