मुंबई - Prabhas : साऊथ अभिनेता प्रभास सध्या 'सालार' चित्रपटामुळं चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभास हा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. दरम्यान प्रभासविषयी एक बातमी समोर येत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. सततच्या कामामुळं त्याची दुखापत आणखीनच वाढली होती. त्यामुळं तो गुडघ्याच्या उपचारासाठी युरोपला गेला होता. तिथे त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रभास आता भारतात परतला आहे. पापाराझींन विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. विमातळावर प्रभास काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये होता. त्यानं चष्मा, टोपी आणि मास्क घातले होते.
'सालार'ची स्टार कास्ट :'सालार'मध्ये प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांच्यासह अनेक दमदार स्टार्स आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. 'सालार' चित्रपट प्रेक्षकांना 1980 च्या दशकात घेऊन जाणार आहे. चुनखडी माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक मनोरंजक कहाणी या चित्रपटाद्वारे सादर करण्यात आली आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहे, कारण यापूर्वी त्याचा 'आदिपुरुष' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. हा चित्रपट 500 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 143 कोटीची कमाई केली होती. या चित्रपटाचं ओम राऊत यांनी दिग्दर्शन केले होत. 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. दरम्यान 'सालार' दोन भागात रिलीज करण्याची योजना आहे. पहिल्या भागाचे नाव 'सालार भाग 1 - सीसफायर' आहे.