मुंबई - Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे कपल 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबद्ध झाले. या जोडप्यानं काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हे फोटो खूप सुंदर आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान आता उदयपूरमध्ये त्यांच्या भव्य लग्नानंतर ते जयपूरमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. हे कपल बोटीतून खाली उतरून चालत असताना त्यांनी स्मितहास्य देऊन पापाराझींचे स्वागत केले. यावेळी परिणीतीनं गुलाब टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केला होता. यावर तिनं लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासह सुंदर अशी मांग भरली होती. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले होते. यावर तिनं खूप कमी मेकअप केला होता.
विमानतळावर झाले रवाना : दुसरीकडे, राघव चड्ढा यांनी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केली होती. तसेच या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचा गॉगल घातला होता. रागनिती एकत्र खूप खास दिसत होते. त्यानंतर दुपारी 2.30 च्या सुमारास राघव चढ्ढा हे परिणीतीसह उदयपूरच्या महाराणा प्रताप विमानतळावर पोहोचले, यावेळी विमानतळावर लोकांनी खूप गर्दी केली होती. या कपलनी उभ्या असलेल्या लोकांचे अभिवादन स्वीकारले. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सोमवारी दिल्लीला रवाना झाले. यानंतर दोघेही दिल्लीतील विमातळावर स्पॉट झाले, इथे देखील अनेकांनी गर्दी केली होती.