महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राजामौली आणि महेशबाबूनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 'अ‍ॅनिमल' प्री रिलीज इव्हेन्टमध्ये केला खुलासा

Animal Pre Release Event : 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या टीमनं हैदराबादमध्ये प्री-रिलीज इव्हेंटमध्ये भाग घेतला. यासाठी रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूरसह दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा उपस्थित होते. यावेळी रणबीर कपूर देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता असल्याचं महेशबाबू म्हणाला, एसएस राजामौली यांनीही रणबीरचं कौतुक केलं.

Animal Pre Release Event
'अ‍ॅनिमल' प्री रिलीज इव्हेन्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 9:54 AM IST

हैदराबाद- Animal Pre Release Event : अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सोमावारी हैदराबादमध्ये करण्यात आलं. यासाठी रणबीर सहकलाकार रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्यासह हजर होता. या कार्यक्रमाला साऊथ इंडियातील अनेक दिग्गज कलाकार आणि सेलेब्रिटी हजर होते. यामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली देखील कलाकारांमध्ये सामील झाले.

यावेळी महेश बाबूने रणबीरवर कौतुकाचा वर्षाव केला आणि रणबीर हा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेता असल्याचे म्हटले. या कार्यक्रमात बोलताना महेश बाबू म्हणाला, "मी त्याला भेटल्यावरही हे सांगितले आहे, पण त्यानं मला फारसं गांभीर्यानं घेतलंय असं वाटत नाही. त्यामुळे आज या मंचावर मी पुन्हा सांगतो की मी त्याचा मोठा फॅन आहे आणि माझ्या मते, तो भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे."

'आरआरआर' दिग्दर्शक राजामौली यांनीही रणबीर कपूर आपला आवडता अभिनेता असल्याचं जाहीर केलं. राजमौलीनं आत्मविश्वासानं सांगितलं, "कोणताही आड पडदा न ठेवता मी तुम्हाला सांगेन, माझा आवडता अभिनेता रणबीर कपूर आहे."

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अलिकडेच या चित्रपटाचं चेन्नईत प्रमोशन झालं. त्यावेळी चित्रपटाचं नाव 'अ‍ॅनिमल' का ठेवलं आहे याचा रणबीर कपूरनं खुलासा केला.

'अ‍ॅनिमल'बद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "मला वाटतं की संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाला 'अ‍ॅनिमल' म्हणण्याचे कारण हे आहे की प्राणी अंतःप्रेरणेने वागतात. ते विचाराअभावी वागत नाहीत. म्हणून मी साकारत असलेल्या पात्राचं वर्तन तसं आहे. आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठीची अंतःप्रेरणा आहे. मला वाटते की तेथूनच 'अ‍ॅनिमल' हे शीर्षक आले आणि एकदा तुम्ही चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा चित्रपट या शीर्षकाला अनुकूल आहे."

'अ‍ॅनिमल' चित्रकपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. अलिकडच्या रिपोर्टनुसार चित्रपटाचा कालावधी 3 तास 21 मिनिटांचा आहे. 'अ‍ॅनिमल' 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'धर्मवीर' काहींना खटकला, पण आम्ही आता 'ऑपरेशनच करुन टाकलंय'; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

2.एमी पुरस्कार घेऊन एकता कपूर परतली भारतात, पाहा व्हिडिओ

3.'कांतारा अ लेजेंड चॅप्टर 1'चा फर्स्ट लुक टीझर रिलीज, ऋषभ शेट्टी दमदार अंदाजात

ABOUT THE AUTHOR

...view details