मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडेच फॅशन हाउस गुच्चीच्या प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये हॉलिवूडच्या काही महान सेलिब्रिटींसोबत दिसली. एका नवीन कँपेनचा एक भाग म्हणून सेलिब्रिटींनी लैंगिक समानतेचा प्रचार केला. गुच्ची या आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडचा चेहरा बनलेल्या आलियाने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर गुच्चीचा हा व्हिडिओ शेअर केला.
हॉलिवूड सेलेब्रिटींसोबत आलिया भट्ट - तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर व्हिडिओ शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'गुच्ची चाइमच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नव्या मोहिमेसाठी उत्सुक आहे! लैंगिक समानतेसाठी गुच्ची चाइम'. व्हिडिओची सुरुवात ज्युलिया गार्नरने स्वत:ची ओळख करून दिली, त्यानंतर हॅले बेली, जॉन लीजेंड आणि सलमा हायेक पिनॉल्टयांनी म्हटले, 'मी लैंगिक समानतेसाठी आवाज देत आहे'. त्यानंतर डेझी एडगर जोन्स, आलिया, सेरेना विल्यम्स, ज्युलिया रॉबर्ट्स आणि इद्रिस एल्बा यांनी 'शिक्षण, सामर्थ्य आणि सन्मानासाठी त्यांचे समर्थन प्रदर्शित केले.
आलिया बनली फॅशन ब्रँड गुच्चीची पहिली भारतीय जागतिक राजदूत- अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच गुच्ची क्रूझ 2024 शोसाठी दक्षिण कोरियामधील सोल येथे प्रवास केला. यावेळी आलियाने पोल्का-डॉट कटआउटसह मिनी ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. तिने गुच्ची जॅकी 1961 सेमीट्रान्सपरन्ट बॅग आणि काळ्या प्लॅटफॉर्म शूजसह तिची फॅशन पूर्ण केली. आलियाला गेल्या महिन्यात लक्झरी फॅशन ब्रँड गुच्चीची पहिली भारतीय जागतिक राजदूत म्हणून घोषित करण्यात आले होते. फॅशन ब्रँडने ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले होते, आलिया भट्ट गुच्ची फॅशन हाऊसची सर्वात नवीन ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे.'
आलिया भट्टची वर्कफ्रंट - दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, आलिया भट्ट पुढे करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तिच्या हातामध्ये प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत जी ले जरा आणि गल गडोतसोबत हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपटदेखील आहे.