महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2023, 2:38 PM IST

ETV Bharat / entertainment

Sushant Singh Rajput : सुशांत सिंहसारख्या दिसणाऱ्या डोमिन अयानला पाहून चाहते झाले भावूक; राखी सावंतने केली कमेंट

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुशांतसारखा दिसणाऱ्या अयानच्या व्हिडिओने चाहते भावूक झाले आहेत. अयानचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण झाले असून राखी सावंतने देखील त्याच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

Sushant Singh Rajput
सुशांत सिंग राजपूत

मुंबई :दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जग सोडून तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण त्याचे चाहते आजही त्याची आठवण काढतात. त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाही की तो या जगात नाही. सुशांतच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. चाहते अजूनही सुशांतशी संबंधित अनेक न पाहिलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. दरम्यान, आता सुशांत सिंह राजपूतच्या एका लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्यक्तीला पाहून लोक गोंधळले आणि आमचा नायक परत आला असे काहीजण म्हणत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सुशांतच्या चाहत्यांना धक्का बसला असून अनेक चाहत्यांचे डोळे ओलावले आहेत. दरम्यान आता या व्हिडिओवर राखी सावंतनेही लाइक करत कमेंट केली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा डुप्लिकेट : सुशांत सिंहसारखा दिसणाऱ्या या मुलाचे नाव डोमिन अयान आहे. त्याचे व्हिडिओ वोम्प्लाच्या पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये तो हुबेहूब सुशांतसारखा दिसत आहे. डॉमिनच्या चेहऱ्यापासून ते त्याच्या स्टाइलपर्यंत तो हुबेहुब सुशांतसारखा दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सुशांत सिंह राजपूतचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. एखाद्याचा चेहरा दुसऱ्याशी इतका कसा जुळू शकतो, याचा विचार करूनही त्यांना आश्चर्य वाटत आहे. डॉमिन अयानच्या या व्हिडिओवर सुशांतचे चाहते जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

चाहत्यांनी पोस्टवर केल्या कमेंट : सुशांत सिंह राजपूतच्या लूकसारखा दिसणाऱ्या अयानच्या व्हिडिओवर कमेंट करत, एका वापरकर्त्याने लिहिले, 'मला वाटले की तो सुशांत आहे. हुबेहुब त्याच्यासारखा दिसतो'. आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'सुशांतचा चेहराही खूप गोंडस आणि निरागस होता'. तर दुसरा वापरकर्ता लिहितो, 'मला माहीत होते की सुशांत परत येईल'. याशिवाय आणखी एकाने लिहिले, 'हा सुशांत कधीच बनू शकणार नाही कारण सुशांत फक्त एकच होता आणि तो आता नाही आहे' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहे.

हेही वाचा :

  1. Kartik Aaryan : 'शहजादा' या चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिक आर्यन घेतला 'हा' निर्णय...
  2. RRKPK Collection Day 10 : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा केला पार...
  3. Indias Got Talent 10 : सोलापूरच्या आदित्यचे पत्ते फेकण्याचे अजब कौशल्य, इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये चीनचा मोडला विश्वविक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details