मुंबई - Vivik Agnihotri praised Alia Bhatt : चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनं लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचं कोतुक केलंय. अलीकडेच एका मुलाखतीत, चित्रपट निर्माता अग्निहोत्रीनं आलियाच्या प्रतिभेबद्दल आणि परिपक्वतेनं स्वतःला हाताळण्याच्या पद्धतीबद्दल कौतुक व्यक्त केलंय. विवेकने खुलासा केला की तो आलिया भट्टचा चाहता आहे.
नुकत्याच एका न्यूजवायरला दिलेल्या मुलाखतीत विवेकनं सांगितलं की तो आलियाच्या कामाची नेहमीच प्रशंसा करतो आणि तिला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो. विवेकनं सांगितलं की, गेल्या काही वर्षांत आलियाचा अभिनेत्री म्हणून ज्याप्रकारे विकास झालाय तो त्याला आवडलाय. विवेकनं आलियावर स्तुती सुमनं उधळताना पुढं सांगितलं की तिच्याकडे सर्जनशील प्रतिभा आहे, म्हणूनच तो तिच्या मोठं होण्याची आणि तिच्या सार्वजनिक वागणुकीची खूप प्रशंसा करतो. विवेक अग्निहोत्री म्हणाला, जेव्हाही तिच्याबद्दल चर्चा होते तेव्हा मी तिच्याविषयी काहीही नकारात्मक स्वीकारण्यास नकार देतो. त्याने पुढे सांगितलं की अभिनेत्री आलिया भट्टं ही कसे परिपक्व असावं याचं ती एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
काश्मीर फाइल्सचा दिग्दर्शक असलेल्या विवेक अग्निहोत्रीनं साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचंही कौतुक केलंय. विवेक म्हणाला, पल्लवी (जोशी) आणि मी तिचा 'मिमी' हा चित्रपट पाहिला आणि मला वाटलं की तिनं खूपच परिपक्व आणि दर्जेदार भूमिका केलीय.
अल्लू अर्जुन आणि आलिया भट्ट या दोन कलाकारांनी अनुक्रमे पुष्पा आणि गंगूबाई काठीयावाडी या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट कलाकारसाठीचा (पुरुष आणि महिला) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलाय. कृती सेनॉनला मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालाय.