मुंबई - Vijay Varma Wedding Plan : विजय वर्मा सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच एका मुलाखतीत दरम्यान त्यानं आपल्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणानं सांगितलं. यावेळी त्याला लग्नाबाबत विचारणात आलं. त्यानंतर त्यानं यावर उत्तर दिल आहे. दरम्यान विजयनं या मुलाखती चाहत्यांचे देखील यावेळी आभार मानले आणि सांगितले की, 'मला खूप चांगले वाटते की मला ऐकण्यासाठी इतके लोक येथे बसले आहेत. साहजिकच त्यांना माझी पात्रं आवडतात. माझी पात्रे खूपच गुंतागुंतीची आहेत, पण मला मिळणारे प्रेम खूप खास आहे'.
विजय वर्माचा चित्रपटामधील प्रवास : संघर्षाच्या दिवसांची आठवण करत त्यानं म्हटलं की, 'जेव्हा मी प्रवास सुरू केला, तेव्हा माझ्या खात्यात फक्त 18 रुपये होते. मी विचार करत असतानाच मला फोन आला की, मला रिपोर्टरची भूमिका करायची आहे. त्यानंतर तिथे गेल्यावर मला कळलं की भूमिका एका इंग्रज रिपोर्टरची होती. मी इंग्लिश चांगलं बोलतो असं मी सांगितलं होतं, पण मला इंग्लिश ठीक येत होती. मी कसेही डायलॉग म्हटले, त्यामुळं मी फसलो. त्यानंतर मला दिग्दर्शकानं फटकारलं. मी ती भूमिका पैशासाठी केली होती, त्यानंतर मी पैशासाठी कोणतीही भूमिका करणार नाही अशी शपथ घेतली. मला वाटलं होतं की मला आवडेल तेच पात्र करेन. अर्जुनप्रमाणेच माझेही लक्ष्य माशाच्या डोळ्याकडे होते. मी ठरवले होते की एक दिवस मी नक्कीच काहीतरी करेन, जे लोकांपर्यंत पोहोचेल. विजयनं पुढं म्हटलं, कासव आणि सशाची कथा सर्वांनी ऐकली असेल. माझी देखील कासवासारखी प्रगती झाली आहे, असा माझा विश्वास आहे'.