हैदराबाद- थलपथी विजय आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'वारीसू' या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळ (AWBI) ने अनिवार्य परवानगीशिवाय पाच हत्तींचा वापर केल्याबद्दल आगामी तमिळ चित्रपट 'वारीसू'च्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. एका खासगी तक्रारीवरुन कारवाई करत, AWBI ने हैदराबादस्थित वेंकटेश्वर क्रिएशन्सला बोर्ड प्री-शूटिंगसाठी नोटीस बजावली आहे.
विजय आणि रश्मिका मंदान्ना यांची भूमिका असलेला 'वारीसू' हा चित्रपट वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली दिल राजू निर्मित करत आहे. AWBI सचिव एसके दत्ता यांनी नोटीसमध्ये (23 नोव्हेंबर) म्हटले आहे की, चित्रपट निर्मात्याने परफॉर्मिंग अॅनिमल्स (नोंदणी) नियम, 2001 चे उल्लंघन केले आहे. नियमानुसार, प्राणी प्रदर्शित किंवा प्रशिक्षण दिले जात असल्यास, प्रत्येक व्यक्तीला मंडळाकडे नोंदणी करावी लागेल. नोटीसनुसार, बोर्डाला वेंकटेश्वर क्रिएशन्सकडून प्री-शूट अर्ज प्राप्त झाला नव्हता. मंडळाच्या परवानगीशिवाय प्राण्यांचे प्रदर्शन करणे हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 26 अन्वये गुन्हा आहे.