मुंबई - बॉलिवूड स्टार जोडपे ( Bollywood star couple ) कॅटरिना कैफ आणि विकी कौशल ( Katrina Kaif and Vicky Kaushal ) यांनी आठवड्याचा शुभारंभ केला आहे. चंदेरी दुनियेतील सर्वात प्रशंसनीय जोडप्याने त्यांच्या चाहत्यांसाठी सुट्टीतील काही मोहक फोटो शेअर केले आहेत. विकी आणि कॅटरिनाची सुट्टी ही 'शुगर रश' होती हेच या फोटोवरुन जाणवते.
सोमवारी सकाळी कॅटरिनाने तीन फोटोंचा सेट सोशल मीडियावर शेअर केला. हिरवा पोशाख परिधान केलेली अभिनेत्री सर्व फोटोंमध्ये हसताना दिसत आहे. कॅटरिनाच्या कॅप्शनवरून असे दिसते की त्यांनी न्यूयॉर्कमधील आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवणावर ताव मारला आहे.
विकी कौशलनेही एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो कॅटरिनाच्या हातात हात घालून रस्ता ओलांडताना दिसत आहे.
वर्क फ्रंटवर, कॅटरिना ही श्रीराम राघवनच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या थ्रिलरमध्ये तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहे. तिने गुरमीत सिंग दिग्दर्शित 'फोन भूत'चे शूट पूर्ण केले आहे. कॅटरिनासोबत या चित्रपटात अभिनय राज सिंग, जॅकी श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत.
विक्कीबद्दल बोलायचे तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याकडे निर्मितीच्या विविध स्तरांवर अनेक प्रोजेक्ट आहेत. सारा अली खान आणि मेघना गुलजार यांच्या 'सॅम बहादूर'सोबत तो दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्याकडे शशांक खेतानचा 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपटही आहे.
हेही वाचा -मुलगी इराच्या वाढदिवसाला आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्तासह लावली हजेरी, फोटो व्हायरल