मुंबई- अभिनेता विकी कौशल स्वतःच्या आयुष्यात काय घडतंय याची कल्पना नेहमी आपल्या चाहत्यांना देत असतो. आपले फोटो तो नियमीतपणे शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. शनिवारचा दिवस त्याला अपवाद नव्हता. त्याने त्याच्या कारमधील स्वतःचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्या गाडीत बसलेला दिसत असून कारच्या खिडकीतून सुर्यप्रकाशाची किरणे आत येत आहेत. त्याची वाढलेली जाड दाढी सर्वांचे लक्ष वेधणारी आहे. 'जीवन गाडी है समय पैया', असे कॅप्शन त्यांने या फोटोच्या पोस्टला दिले आहे.
त्याचे चाहते आता त्याच्या वाढलेल्या दाढीचेही कौतुक करताना थकत नाहीत. 'दाढी में जोश है', असे सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट अलीम हकीम यांनी लिहिलंय. त्याच्या या रांगड्या लूकची भरपूर वाहवाही होताना दिसते. दरम्यान, वर्कफ्रंटवर विकी कौशल सध्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाच्या यशात वावरत आहेय या चित्रपटामध्ये सारा अली खान देखील आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. भारतात आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ८२.३१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
विकीने या चित्रपटाबद्दलच्या त्याच्या उत्साहाचे वर्णन करताना म्हटले होते की, 'लक्ष्मण सर आणि मॅडॉक यांच्यासोबत काम करणे हा एक आनंददायी अनुभव होता. मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी, विशेषत: सारासोबत खूप छान वेळ मिळाला आणि आशा आहे की प्रेक्षकांनाही आमच्याप्रमाणेच चित्रपटाचा आनंद मिळेल'. याबद्दल बोलताना सारानेही आपली प्रतिक्रिया दिली होती. 'अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. या चित्रपटात नातेसंबंध, विवाह यावर एक अनोखा विचार आहे आणि प्रेक्षक ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे,' असे सारा म्हणाली.
येत्या काही महिन्यांत विकी सॅम बहादूर या चित्रपटामध्ये दिसणार आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित, 'सॅम बहादूर' ही भारताचे युद्ध नायक आणि पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची कथा आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना विकी म्हणाला, 'एक खऱ्या आयुष्यातील नायक आणि देशभक्ताची भूमिका साकारण्याचे माझे भाग्य आहे, ज्याला आपल्या देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अजूनही स्मरणात ठेवले जाते आणि प्रेम केले जाते. एक अभिनेता म्हणून खूप काही शिकण्यास आणि परत घेण्यासारखे आहे. संपूर्ण टीमने किती तयारी आणि मेहनत घेतली आहे, मला खात्री आहे की आजचा भारत बनवण्याचा सॅमचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक रोमांचित होतील.'