महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

नील भट्टनं केली अंकिता लोखंडेच्या पतीची पोलखोल; जाणून घ्या विकी जैनचं रहस्य - बिग बॉस 17

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'मध्ये नील भट्टनं विकी जैनचे एक मोठे रहस्य उघड केलं आहे. हे रहस्य उघड झाल्यानंतर घरातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत.

Bigg Boss 17
बिग बॉस 17

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 1:14 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 : वादग्रस्त टीव्ही शो 'बिग बॉस 17' हा खूप आता खूप मनोरंजक होत आहे. या शोमध्ये दररोज स्पर्धकांची अनेक गुपिते समोर येत आहेत. मागच्या भागातही असं काही घडलं ज्यामुळं बिग बॉसच्या घरामधील सर्वचं सदस्य चकित झाले. अंकिता लोखंडेच्या पतीचे म्हणजेच विकी जैनचे एक मोठे रहस्य या शोमध्ये उघड झाले. हे रहस्य ऐकल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य हादरून गेले.

विकी-अंकिताला मिळालेल्या सेवेमुळे कुटुंबीय संतापले: शेवटच्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना एक खास सर्व्हिस मिळाली होती, त्यानंतर घरातील सर्वच सदस्यांनी बंड केलं. विकी मेडिकल रूममधून बाहेर आला, तेव्हा तहलकाच्या लक्षात आलं की त्याचे केस कापले गेले आहेत आणि दाढीही सेट केली गेली आहे. यानंतर तहलका आणि अरुण यांनी बिग बॉसवर संताप व्यक्त केला. त्यानंतर मनारा चोप्रानं असेही सांगितले की, अंकिताला मेडिकल रूममध्ये हेअर स्पा देण्यात आला आहे. यानंतर घरातील काही सदस्य चिडले. तहलका, अरुण आणि मनारा यांनीही बिग बॉससमोर आपल्या मागण्या मांडल्या.

नीलनं विकी जैनचं रहस्य केलं उघड :नील भट्टनं विकी जैनचे एक मोठे रहस्य घरातील सदस्यांसमोर उघड केले. नीलनं घरातील सर्व सदस्यांना समजावून सांगितले की, विकीचे केस बनावट आहेत. त्याला केशरचना आणि टक्कल पडण्याची समस्या आहे, म्हणून त्याला विगची आवश्यकता आहे. दर दोन आठवड्यांनी तो त्याला वैद्यकीय गोंदानं चिकटवतो. कदाचित शोमध्ये येण्यापूर्वी त्यानं कॉन्ट्रॅक्टमध्ये हे लिहलं असावं. त्यामुळेच त्याला बिग बॉसकडून ही सेवा मिळत आहे.

बिग बॉसनं घेतला मोठा निर्णय : घरातील सदस्यांनी या जोडप्याच्या सेवेबद्दल जाणून घेतल्यानंतर, बिग बॉसनं विकी आणि अंकिताची सेवा न देण्याचा विचार केला होता. बिग बॉस सांगितलं की, 'मी आधीच सांगितले होते की ही मागणी तुम्हाला महागात पडू शकते. आता जोपर्यंत कुटुंबातील सदस्य या सेवेला सहमती देत ​​नाहीत, तोपर्यंत अंकिता आणि विकी यांना लाभ घेता येणार नाही. यानंतर हे जोडपे कुटुंबातील सर्व सदस्यांना याबद्दल पटवून देतात आणि सर्वजण त्यास सहमती देखील देतात.

हेही वाचा :

  1. 'तुम बिन' फेम प्रियांशू चॅटर्जीचा 'हटके' फोटो सोशल मीडियावर व्हायरल
  2. 'टायगर 3'नं विश्वचषक सामन्याच्या फायनलच्या दिवशी केली 'एवढी' कमाई; जाणून घ्या
  3. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर अनुष्का शर्मानं विराटला मारली मिठी

ABOUT THE AUTHOR

...view details