मुंबई - सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या विशेषतः सेलेब्रिटीजना त्यांच्या मनासारखे व्यक्त होता येईलच असे नाही. जेव्हा कधी आपल्यातील कमजोऱ्या किंवा आजारा उघडपणे कबुल करायचा असतो तेव्हा एक वेगळे धैर्य जवळ असणे आवश्यक असते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका ट्विटमध्ये खुलासा केला आहे की, त्यांना 'डिस्लेक्सिया'चा त्रास आहे. त्यांनी सोमवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'जीवनातील धडा मी पूर्णतः डिस्लेक्सिक आहे. शोधलं तर अनेक कलाकार, कवी, संगीतकार यांनाही डिस्लेक्सियाचा त्रास होतो. तुम्हालाही आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ( artificial intelligence ) मला व्हिज्युअल गणिताची आवड निर्माण झाली, पण शाळेत गणिताबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता...अर्थातच! डिस्लेक्सियाच्या संख्येला काही अर्थ नसतो.'
शेखर कपूर यांना डिस्लेक्सिया- शेखर कपूर यांच्या या ट्विटने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी आपले मत व्यक्त केलेी आहेत. 'मी डिस्लेक्सिक आहे, व्यवसायाच्या गणिताबद्दल गोडी विकसित केली आहे कारण त्याचे एक ध्येय समोर होते. पारंपारिक गणिते मला अजूनही भयानक स्वप्न देतात,' असे एकाने ट्विटरवर लिहिले. दुसर्या व्यक्तीने लिहिले, जागरूकता आणि दुर्मिळ संवेदनशीलतेसह हा विषय मांडल्याबद्दल धन्यावाद.' तर एकाने लिहिलंय की, 'शेखरजी तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज नाही, त्यासाठी इतरही कात्रे तंत्रे आहेत.'