मुंबई : Varun Tej Lavanya Tripathi :तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी अखेर विवाहबंधनात अडकले. या जोडप्यानं १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीतील टस्कनी येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. वरुण आणि लावण्याच्या लग्नाला मेगास्टार चिरंजीवी, पवन कल्याण, राम चरण, अल्लू अर्जुन यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. वरुण आणि लावण्या यांनी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. या जोडप्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी विमातळावर स्पॉट :विवाह झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपं हैदराबाद विमानतळावर स्पॉट झालं. त्यांचं तेथे फुलांनी स्वागत करण्यात आलं. वरुण तेजनं यावेळी निळा टी-शर्ट आणि तपकिरी बॉम्बर जॅकेट घातलं होतं. यासोबत त्यानं स्टायलिश सनग्लास लावला होता. यावर त्यानं गळ्यात चेन घातली होती. तर लावण्या नो-मेकअप लूकसह पिवळ्या सलवार सूटमध्ये दिसली. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. या नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो २ नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत वरुणनं लिहलं, 'माय लव्ह'. फोटोमध्ये दोघेही एकत्र फोटोसाठी पोझ देताना दिसत होते. वरुण तेज आणि लावण्या त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगनंतर हैदराबादला परतल्यावर त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे.