महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पॅरिसमध्ये 'बवाल': वरुण धवनने जान्हवी कपूरसोबत शेअर केली मजेशीर झलक -

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या बवाल या चित्रपटाच्या शुटिंगसाठी पॅरीसमध्ये दाखल झाला आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूरही आहे. त्याच्या या 'पॅरिस' शूट डायरीमधील काही मजेशीर झलक शेअर केल्या आहेत.

वरुण धवन आणि जान्हवी
वरुण धवन आणि जान्हवी

By

Published : Jun 8, 2022, 10:16 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने सहकलाकार जान्हवी कपूरसह 'बवाल'च्या त्याच्या 'पॅरिस' शूट डायरीमधील काही मजेशीर झलक शेअर केल्या आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या 'जुग जुग जीयो' स्टार वरुण धवन त्याच्या आगामी 'बवाल' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जान्हवी कपूरसोबत पॅरिसला रवाना झाला आहे. मंगळवारी त्याने जान्हवी कपूरसोबत एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांच्या मजेदार-शूट डायरीची झलक शेअर केली.

वरुण धवन आणि जान्हवी

फोटोत तो बोलार्डवर उभा असल्याचे दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि हिरवट-निळ्या रंगाचे जाकीट परिधान केले होते. त्याला निळ्या जीन्सच्या जोडीने त्याने टोपीची जोड दिली. दुसरीकडे, जान्हवी पांढर्‍या स्नीकर्स आणि ग्रे स्टोलसह बेज रंगाचा पोशाख सुंदर दिसत आहे.

पॅरिसच्या रस्त्यावर नाचताना वरुण

त्याच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वरुण धवनने त्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात तो जुग जुग जीयोमधील रंगसारी गाण्यावर पॅरिसच्या रस्त्यावर नाचताना दिसतो.

नितेश तिवारी दिग्दर्शित 'बवाल'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. हा ड्रामा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details