महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Varun Dhawan with Atlee : अ‍ॅटली कुमारच्या आगामी मास अ‍ॅक्शन एन्टरटेनर चित्रपटात वरुण धवन - अ‍ॅक्शन एन्टरटेनर चित्रपटात वरुण धवन

'बवाल' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर वरुण धवन एका महत्त्वकांक्षी चित्रपटासाठी रोमांचीत झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक 'व्हीडी १८' असणार आहे आणि याचे दिग्दर्शन 'जवान' फेम दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार करणार आहे.

Varun Dhawan with Atlee
अ‍ॅटली कुमारच्या चित्रपटात वरुण धवन

By

Published : Jul 26, 2023, 1:31 PM IST

मुंबई - अभिनेता वरुण धवनचा जान्हवी कपूरसोबत 'बवाल' हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. नितिश तिवारी दिग्दर्शित 'बवाल'मध्ये अजय दीक्षित ( वरुण धवन ) आणि निशा ( जान्हवी कपूर ) यांची थ्रिलिंग लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील ऑशविट्झ येथील दृष्यांना लोकांनी भरपूर पसंती दर्शवली आहे आणि प्रेक्षक कौतुक करताना थकत नाहीत.

दरम्यान, वरुण धवन आजकाल भरपूर कामात गुंतला आहे. यातून वेळ काढत त्याने जान्हवी कपूर आणि नितीश तिवारीसोबत एका मुलाखतीसाठी वेळ दिला. यात त्याने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलचाही खुलासा केला. तो 'व्हीडी १८' या तात्पुरते शीर्षक ठरलेल्या चित्रपटात काम करत असून याचे दिग्दर्शन 'जवान' फेम दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार करणार आहे.

त्याच्या आगामी 'व्हीडी १८' चित्रपटाबद्दल विचारले असता वरुण धवन म्हणाला, 'मी याबद्दलचा अधिक तपशील सांगू शकणार नाही, पण हे फारच रोमांचक असणार आहे.' वरुणने चित्रपटाविषयी फारसे काही सांगितले नसले तरी तो अ‍ॅटलीसोबत काम करण्यासाठी किती रोमांचीत झाला आहे हे दिसून आले. पुढे म्हणाला की, 'याबद्दल मी फक्त एकच सांगू शकतो की हा चित्रपट एक मास अ‍ॅक्शन एन्टरटेनर चित्रपट आहे. चित्रपटात भरपूर गंमत आहे आणि मला ती एन्जॉय करायची आहे. माझ्याकडे जे काही आहे ते सर्व यासाठी मी देणार आहे.'

वरुण धवन आणि अ‍ॅटली कुमार एकत्र येत आहेत ही बातमी २०२३ च्या मे महिन्यात आली होती. त्यानंतर २ जुलै रोजी वरुणने या चित्रपटाची रिलीज तारीखही जाहीर केली होती. त्याने यावेळी दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार आणि निर्माता मुराद खेतानी यांच्यासोबत अ‍ॅक्शन एन्टरटेनर चित्रपट करत असल्याचे सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार वरुण धवनच्या या आगामी अ‍ॅटली कुमारच्या चित्रपटात इमोशन्स आणि नाट्यमयता असणार आहे, तर जबरदस्त अ‍ॅक्शनही यात असेल. चित्रपटाची टीम लार्ज दॅन लाईफ सीक्वेन्सेस वरुण धवनसाठी बनवत आहेत. चार ते पाच महिन्याच्या कालावधीत चित्रपटाचे शुटिंग केले जाणार आहे. २०२४ च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज होणार आहे.

हेही वाचा -

१.Jaya Bachchan Returns: पापाराझींवर भडकल्या मॅडम, नेटिझन्स म्हणतात 'जया बच्चनको इतना गुस्सा क्यूँ आता है?'

२.Oppenheimer Box Office Collection Day 5: 'ओपनहायमर' चित्रपटाने पाचव्या दिवशी केली ६२ कोटीची कमाई...

३.Mi 7 Box Office Collection Day 14 :'ओपेनहाइमर' आणि 'बार्बी' चित्रपटामुळे 'मिशन इम्पॉसिबल ७'च्या कमाईत घसरण...

ABOUT THE AUTHOR

...view details