महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor spotted in new look : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुलगी राहासोबत दुबईला रवाना - आलिया भट्ट

सेलिब्रिटी कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहासोबत कौटुंबिक सुट्टीसाठी दुबईला रवाना झाले आहेत. विमानतळावर हौशी फोटोग्राफर्सनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

Ranbir Kapoor spotted in new look
लिया भट्ट आणि रणबीर कपूर

By

Published : Jun 22, 2023, 2:20 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे पॉवर कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांची लहान मुलगी राहासोबत मुंबई विमानतळावर फोटोसाठी पोझ देताना दिसले. दोघेही आपल्या कामाच्या धबडग्यातून वेघ काढून मुलीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी देशाबाहेर जाताना दिसले. आलिया भट्ट सध्या तिच्या बाळासोबत मातृत्वाचा प्रत्येक क्षण अनुभवण्याचा विचार करत आहे.

फोटोंमध्ये आलिया छान स्लिंग बॅगसह सर्व-काळा ट्रॅकसूट परिधान केलेली दिसत आहे. यावेळी तिने हलका मेकअप केला होता व डोळ्यावर काळे सनग्लासेस घातले होते. एअरपोर्ट स्टाइलसाठी रणबीर अगदी नवीन लूकमध्ये दिसला.

अ‍ॅनिमल चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर, रणबीर कपूरने दाढी काढली असून क्लीन-शेव्हमध्ये परतला आहे. त्याने पांढरा शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर्स घातला होता व त्याच्या बाजूला बॅग होती. विमानतळावर ही जोडी एकत्र अप्रतिम दिसत होती.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत त्यांची मुलगी राहा देखील उपस्थित होती, परंतु त्यांनी विनंती केली की पापाराझींनी तिचे फोटो काढणे टाळावे. त्यांचे व्हिडीओ आणि छायाचित्रे ऑनलाइन रिलीझ केल्यावर त्यांचे चाहते वेडे झालेले दिसले. त्यांनी प्रतिक्रिया देताना या सुंदर जोडप्याचे तोंडभर कौतुक केले आहे. त्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, आलिया नुकतीच ब्राझीलच्या सहलीवरून परतली आहे, या ठिकाणी तिने तिने नेटफ्लिक्सच्या टुडम इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. यावेळी तिने तिच्या हॉलीवूड पदार्पणाचा चित्रपट हार्ट ऑफ स्टोनच्या ट्रेलरचे अनावरण केले. या चित्रपटात आलियाची हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत भूमिका आहे. आलिया सध्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीर सिंगसोबत काम करत आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दुसरीकडे रणबीरने संदीप रेड्डी वंगा यांच्या अ‍ॅनिमलचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. प्री-टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि यातील त्याच्या भूमिकेचा लूक पाहून सर्वजण अवाक झाले आहेत. या चित्रपटाकडू त्याला व त्याच्या चाहत्यांनाही खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा -

१.Adipurush Box Office Collection: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'चे सहव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

२.First Look Poster : विजयच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त लिओ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च

३.Pratibimb Marathi Natya Utsav 2023 : 'प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२३'मध्ये मकरंद देशपांडे यांची स्फोटक मुलाखत!

ABOUT THE AUTHOR

...view details