महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Upasana's emotional predelivery video : आई झाल्याचा आनंद मावेना! राम चरणची पत्नी उपासनाने शेअर केले खास फोटो - बाळाचा फोटो

साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राम- उपासनासह त्यांचे नवजात बाळ देखील दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये उपासना फार आनंदी दिसत आहे.

Upasana and  Ram Charan
राम चरण आणि उपासना

By

Published : Jun 26, 2023, 12:50 PM IST

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि उपासना लग्नाच्या 11 वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. या जोडप्याने आई-वडील होण्याचा प्रवास हा सतत त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या जोडप्याने पहिल्या महिन्यापासून, तर बेबी शॉवरपर्यत, सोशल मीडिया अनेक अपडेटस् याबाबत आपल्या चाहत्यांना दिल्या. या दोघांनी खास क्षणाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

उपासनाने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ केले शेअर :अलीकडेच उपासनाने आपल्या मुलीच्या आगमनाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. उपासनाने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तिच्या मुलीच्या जन्मापूर्वी हॉस्पिटलमध्ये असतानाचा आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये, उपासनाला प्रसूतीसाठी नेले जात आहे, जात असताना ती खूप आनंदी आहे आणि तिच्या मित्रांशी बोलत आहे. तितक्यात उपासना हसली आणि बोलू लागली, 'अरेरे, तुझ्या डोळ्यात अश्रू फार कमी वेळा येतात. त्यानंतर शुभेच्छा दिल्या गेल्या. उपासना तिच्या या फोटोमध्ये फार आनंदी दिसत आहे.

राम-उपासना दिल्या गेल्या शुभेच्छा :क्लिप रिपोस्ट करत उपासनाने लिहिले, '5 दिवसांपूर्वी, आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण'. राम आणि उपासना मंगळवारी एका मुलीचे आई-वडील झाले. शनिवारी त्यांनी आपल्या मुलासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला, जो खूपच सुंदर आहे. राम चरण आणि उपासना यांनी अद्याप त्यांच्या मुलीचे नाव उघड केलेले नाही. 20 जून रोजी, फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या नवजात बाळासाठी राम-उपासनाचे अभिनंदन केले. रामचे वडील चिरंजीवी यांनी ट्विटरवर लिहिले की, 'लहान मेगा प्रिन्सेसचे स्वागत आहे'. राम आणि उपासना यांनी डिसेंबरमध्ये गर्भधारणेची घोषणा केली होती. राम आणि उपासना कॉलेजदरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतरण प्रेमात झाले. त्यानंतर वर्षानुवर्षे डेटिंग केल्यानंतर 2012 मध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली.

वर्कफ्रंन्ट : 'आरआरआर'ने रामचरणला जागतिक स्तरावर जबरदस्त ओळख मिळवून दिली आहे. येत्या काही दिवसांत राम चरण तामिळ-तेलुगू द्विभाषिक 'गेम चेंजर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही काम करत आहे. याशिवाय दिग्दर्शक बुची बाबू सना यांचा एक चित्रपटही राम चरणकडे आहे.

हेही वाचा :

  1. Adipurush Box Office collection day 9 : आदिपुरुषची बॉक्स ऑफिसवर किती कमाई, जाणून घ्या आकडेवारी
  2. Controvesy On Adipurush: आदिपुरुष चित्रपटाला करणी सेनेचा कडाडून विरोध; निर्माते व दिग्दर्शकाचे पोस्टर जाळले
  3. Sonu Soods Sambhavam : 'संभवम' मार्फत सोनू सूद देणार स्पर्धा परीक्षांसाठी स्कॉलरशिप!

ABOUT THE AUTHOR

...view details