मुंबई Umang 2023 : मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री उमंग या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, बॉबी देओल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी यांच्यासह अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 'उमंग 2023' पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले सेलिब्रिटी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसले. दरम्यान सोशल मीडियावर काही सेलेब्सचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान या वर्षी प्रदर्शित झालेला 'अॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर चांगलचं वादळ निर्माण केलं आहे. रणबीर कपूरचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हा चित्रपट आहे.
बॉबी आणि रणबीरचा स्पेशल बॉन्ड : या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका बॉबी देओलनं साकारली आहे. 'अॅनिमल'चं दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केलं आहे. दरम्यान प्रत्येक शो आणि प्रत्येक फंक्शनमध्ये बॉबीची उपस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईत 'उमंग 2023' मध्ये रणबीर आणि बॉबी उपस्थित होते. 'अॅनिमल'चे दोन्ही स्टार्स या कार्यक्रमादरम्यान खूप प्रेमळपणे भेटले. रणबीरला पाहून बॉबी खूप उत्साहित झाला. आल्यानंतर रणबीर थेट बॉबीकडं जाऊन त्याला मिठी मारत असल्याचं दिसत आहे. रणबीर आणि बॉबी देओलमध्ये खूप छान बाँडिंग आहे. याशिवाय रणबीरनं अनेकदा सांगितलं आहे की, तो लहान वयात बॉबीची फॅशन फॉलो करत होता.