मुंबई - तू झुठी मैं मक्कार या चित्रपटाच्या निर्मात्यांनी २३ जानेवारी रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. एका विचित्र टीझरनंतर, तू झुठी मैं मक्कारचा ट्रेलर मजा आणि करमणूक दुप्पट करण्याचे वचन देणारा आहे.
लव रंजन दिग्दर्शित, हा चित्रपट रणबीरच्या आवडत्या रोम-कॉम प्रकारात पुनरागमन करत आहे. रोमँटिक भूमिकेत प्रेक्षकांना आवडत असलेला अभिनेता शमशेरा आणि ब्रह्मास्त्र सारख्या चित्रपटांमध्ये काही भारी कामगिरी करताना दिसला नव्हता TJMM (तू झुठी मैं मक्कार ) च्या ट्रेलर मध्ये रणबीर त्याच्या आकर्षक स्क्रीन उपस्थितीने चाहत्यांना आकर्षित करण्यास तयार आहे.
रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री इंटरेस्टिंग दिसतेय. या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही पण तू झुठी मैं मक्कारचा ट्रेलर पाहता असे दिसते आहे की त्यांनी चित्रपटावर काम करताना चांगला वेळ घालवला आहे आणि चित्रपटाच्या झलकांमध्ये त्याचा उत्तम परिणाम दिसत आहे. ट्रेलर लव रंजनच्या चित्रपटाच्या मजेशीर दुनियेत डोकावून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. झुठीच्या भूमिकेतील आकर्षक श्रध्दा आणि मक्कार रणबीर यांनी आपल्या पात्रांना न्याय देण्याच केलेला प्रयत्न जाणवत आहे.
हा चित्रपट रणबीर आणि श्रद्धा यांचा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट आहे. TJMM हा वर्षातील अत्यंत अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे कारण याला अनेक वेळा विलंब झाला आहे. हा चित्रपट शेवटी 8 मार्च 2023 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.
दरम्यान, रणबीर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या आगामी अॅक्शन फिल्म अॅनिमलमध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत दिसणार आहे. श्रद्धाच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर ती लंडनमधील चालबाज आणि नागिन ट्रायॉलॉजीमध्येही दिसणार आहे.