मुंबई - Trupti Dimri :अभिनेत्री तृप्ती डिमरी 'अॅनिमल' चित्रपटामुळं सध्या चर्चेत आहे. 6 वर्षांपूर्वी तृप्तीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दरम्यान रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' या चित्रपटात तृप्तीनं झोया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तृप्ती या चित्रपटाद्वारे 'भाभी 2' म्हणून जास्त प्रसिद्ध झाली आहे. आता पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाला मागे टाकून तृप्ती नवीन 'नॅशनल क्रश' बनली आहे. तृप्ती तिच्या हॉटनेस आणि रणबीर कपूरसोबतच्या इंटिमेट सीन्समुळं चर्चेत आली. तृप्तीनं 'अॅनिमल' या चित्रपटात काम करण्यासाठी खूप कमी फी घेतली आहे. आता या चित्रपटासाठी तिनं किती फी घेतली हे जाणून घेऊया.
'अॅनिमल' तृप्ती डिमरी घेतली 'इतकी' फी : 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'अॅनिमल' या चित्रपटासाठी रणबीर कपूरनं फी कमी केली आणि फक्त 35 कोटी रुपये घेतले. रणबीर हा एका चित्रपटासाठी 70 कोटी फी घेत असतो. त्याचबरोबर 'अॅनिमल'मध्ये खलनायक अबरारची भूमिका साकारून जगभरात लोकप्रिय होत असलेल्या बॉबी देओलनं 5 कोटी रुपये मानधन घेतले आहे. रश्मिका मंदान्ना या चित्रपटासाठी 4 कोटी रुपये मानधन घेतले आहे. त्याचबरोबर 'अॅनिमल' स्टार रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी अनिल कपूरनं 2 कोटी रुपये घेतले आहेत. दरम्यान हा चित्रपट पतौडी पॅलेस म्हणजेच सैफ अली खानच्या हवेलीमध्ये शूट झाला आहे, ज्यासाठी सैफनं एक पैसाही घेतला नाही, कारण रणबीर कपूर अभिनेता सैफ अली खानचा मेव्हणा आहे.