महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तृप्ती डिमरीचे विकी कौशलसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल - तृप्ती डिमरी

Tripti Dimri with Vicky Kaushal : अभिनेत्री तृप्ती डिमरीचे विकी कौशलसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये विकी हा तृप्तीसोबत रोमँटिक गाण्याचं ट्रॅक शूट करताना दिसत आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 2:56 PM IST

मुंबई - Tripti Dimri with Vicky Kaushal :अभिनेत्री तृप्ती डिमरीनं 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये खूप दमदार अभिनय केला. या चित्रपटासाठी तिचं प्रचंड कौतुक करण्यात आलं आहे. दरम्यान तिला 'अ‍ॅनिमल'नंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. ती लवकरच प्रभास आणि विकी कौशलसोबत रोमान्स करताना रुपेरी पडद्यावर दिसेल. सध्या तृप्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात जबरदस्त इंटिमेट सीन्स देणारी तृप्ती डिमरी फोटोत विकी कौशलसोबत दिसत आहे. विकी आणि तृप्ती 2022 मध्ये क्रोएशियामध्ये होते, जिथे त्यांनी चित्रपटासाठी एक रोमँटिक ट्रॅक शूट केला होता. लीक झालेल्या फोटोंमध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान विकी तृप्तीसोबत एक सीन करताना दिसत आहे, ज्यात तो तृप्तीच्या कमरेला पकडून आहे.

तृप्ती डिमरी

तृप्ती डिमरी फोटो व्हायरल :'अ‍ॅनिमल'मध्ये तृप्तीनं कॅमियो केला. तिची ही भूमिका प्रचंड चर्चेत होती. 'बुलबुल' आणि 'काला'मध्ये दमदार भूमिका केल्यानंतर तृप्ती दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या प्रोजेक्टमध्येही चमकली. आनंद तिवारीच्या 'मेरे मेहबूब मेरे सनम'मध्ये तृप्ती डिमरी आणि विकी कौशल पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बातमी आली होती की, विकी आणि तृप्ती यांनी त्यांच्या आगामी 'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. धर्मा प्रॉडक्शन निर्मित 'मेरे मेहबूब मेरे सनम'मध्ये एमी विर्क आणि नेहा धुपिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'मेरे मेहबूब मेरे सनम'मधील या गाण्याचं दिग्दर्शन फराह खाननं केलं आहे. हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटामधील दृश्य :याशिवाय तृप्ती ही प्रभाससोबत 'स्पिरीट' या आगामी चित्रपटामध्ये दिसेल. तृप्तीचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा दुसरा पार्ट 'अ‍ॅनिमल पार्क' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 'अ‍ॅनिमल पार्क'मध्ये तृप्ती असेल की नाही याबद्दल सध्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दुसरीकडे 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट यशाचे डोंगर चढत आहे. या चित्रपटानं जगभरात 750 कोटीहून अधिक कमाई करून अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

हेही वाचा :

  1. बार्सिलोना फुटबॉल सामन्यादरम्यान डिस्प्लेवर झळकले 'अ‍ॅनिमल'चे पोस्टर्स
  2. 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या भूमिकेवर वडील धर्मेंद्रनं दिली 'ही' प्रतिक्रिया
  3. एमी-विजेता अभिनेता आंद्रे ब्राउगर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details