मुंबई - 2018 - Every is a Hero : टोविनो थॉमस स्टारर '2018 - एव्हरी इज ए हिरो' या चित्रपटानं ऑस्कर 2024 साठी अधिकृत एंट्री घेतली आहे. हा चित्रपट मॉलीवुडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपट 2018 च्या केरळ पूरावर आधारित आहे. हा चित्रपट ज्युड अँथनी जोसेफ यांनी दिग्दर्शित केला होता. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपट मल्याळम भाषेनंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये टोविनो थॉमस व्यतिरिक्त कुंचको बोबन, तन्वी राम आणि अपर्णा बालमुरली यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकराल्या आहेत. या चित्रपटानं जगभरात 200 कोटीची कमाई केली होती.
मल्याळम चित्रपटाची उल्लेखनीय कामगिरी : '2018 - एव्हरी इज ए हिरो' या चित्रपटाचा खूप क्रेझ होती. या चित्रपटानं देशांतर्गत खूप जलद गतीनं 100 कोटींचा टप्पा गाठला होता. या मल्याळम चित्रपटानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपटाची निर्मिती वेणू कुनापिली यांनी केली. काव्या फिल्म कंपनीच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटानं जगभरात जबरदस्त कमाई केली. उन्नी मुकुंदनच्या पौराणिक नाटक 'मलिकाप्पुरम'च्या यशानंतर हा चित्रपट काव्याचा दुसरा बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर आहे. '2018 - एव्हरी इज ए हिरो' चित्रपटाला समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट आहे.