महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kali Peeli Taxi : हिंदी चित्रपटसृष्टीतील काळी पिवळी टॅक्सीवर आधारित 'या' चित्रपटांबद्दल जाणून घ्या ; टॉप सहा चित्रपट... - टॅक्सी नंबर 9 2 11

Kali Peeli Taxi : मुंबईकरांना प्रवासाची सुविधा देणाऱ्या काली पीली आता रोडवर धावताना दिसणार नाही. दरम्यान आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अशा चित्रपटबद्दल सांगणार आहोत, ज्या काळी पिवळी टॅक्सीवर आधारित आहेत.

Kali Peeli Taxi
काळी पिवळी टॅक्सी

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 12:28 PM IST

Updated : Oct 30, 2023, 3:47 PM IST

मुंबई - Kali Peeli Taxi :मुंबईच्या समाजमनाशी एकरुप झालेली काळी-पिवळी टॅक्सी आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या फक्त आठवणीतच उरणार आहे. अनेक दशकं मुंबईतल्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी काळी पिवळी टॅक्सी आजपासून प्रवास थांबवतेय. 30 ऑक्टोबर 2023 हा मुंबईतल्या लोकप्रिय काळी पिवळी टॅक्सी प्रीमियर पद्मिनीचा शेवटचा दिवस ठरला आहे. मुंबईच्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीनं करोडो लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा काळी पिवळीनं स्वतःचं अस्तित्व दाखवलं. इतकं की, काही चित्रपटच काळी पिवळी टॅक्सीला केंद्रस्थानी ठेऊन बनवले गेले. अशाच काही चित्रपटांविषयी माहिती घेऊ या....

टॅक्सी ड्रायव्हर :हा चित्रपट 1954 रोजी रुपेरी पडद्यावर आला होता. 'टॅक्सी ड्रायव्हर' चित्रपटाचं दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केलं होतं. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक एस.डी. बर्मन दिलं होतं. 'टॅक्सी ड्रायव्हर' चित्रपटामध्ये अभिनेता देव आनंद अभिनेत्री कल्पना कार्तिक, शीला रामाणी, जॉनी वॉकर, भगवान सिन्हा या कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची कहाणी : दोन गुंड मालाचा (कल्पना कार्तिक) विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा टॅक्सी चालक असलेला मंगल (देव आनंद) मालाला वाचवतो. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या चित्रपटाची कहाणी मंगल आणि मालाच्याभोवती फिरणारी आहे. या चित्रपटामधील गाणी देखील सुमधुर आहेत.

खुद्दार :'खुद्दार' हा 1982 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी टंडन यांनी केलं. 'खुद्दार'मध्ये अमिताभ बच्चन, संजीव कुमार, परवीन बाबी, विनोद मेहरा, प्रेम चोप्रा, मेहमूद, बिंदिया गोस्वामी आणि तनुजा यांच्या भूमिका आहेत.

काळी पिवळी टॅक्सी

चित्रपटाची कहाणी : अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट टिपीकल 'लॉस्ट अँड फाउंड' फॉर्म्युल्यावर बेतलेला होता. यात अमिताभनं टॅक्सी ड्रायव्हरची व्यक्तिरेखा साकारली. धाकट्या भावाच्या, म्हणजे विनोद मेहराच्या शिक्षणासाठी अमिताभ बच्चन रात्र-दिवस टॅक्सी चालवतो. या चित्रपटातली काळी पिवळी टॅक्सी बच्चनच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही.

टॅक्सी नंबर 9 2 11 : मिलन लुथरिया दिग्दर्शित आणि रमेश सिप्पी निर्मित हा चित्रपट 2006मध्ये प्रदर्शित झाला होता. यात नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चेंजिंग लेन्स' या अमेरिकन चित्रपटाचा रिमेक आहे.

चित्रपटाची कहाणी : राघव शास्त्री (नाना पाटेकर) दुहेरी आयुष्य जगत असतो. प्रत्यक्षात तो टॅक्सी चालक असतो. पण तो पत्नीला विमा सेल्समन म्हणून असल्याचं सांगतो. अचानक त्याला शहरातील श्रीमंत बिझनेमॅनचा मुलगा जय मित्तल भेटतो. जयला कोर्टात जायचं असतं. त्याच्या कारमध्ये मध्ये बिघाड झाल्यामुळे तो राघवच्या टॅक्सीमध्ये बसतो. त्याला कोर्टात लवकर पोहोचायचं असतं. त्यामुळे तो राघवला अधिक पैसे देऊन टॅक्सी वेगानं चालवायला सांगतो. त्यानंतर राघव सिग्नल तोडतो. राघवकडून एक अपघात घडतो. त्याच्या टॅक्सीची टक्कर एका कारशी होते. राघवला पकडला जातो. पण जय तिथून निसटतो. या चित्रपटाची कहाणी खूप मजेशीर आहे. राघव आणि जयमधल्या 'तू तू मैं मैं' मुळे चित्रपट अधिक रंजक बनतो. विशेष म्हणजे यात नाना आणि जॉनइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त राघवच्या टॅक्सीला म्हणजे 'टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह' ला महत्त्व आहे.

'खाली पीली' :ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांचा 'खाली पीली' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. 'खाली पीली' या चित्रपटाचं दिग्दर्शक मकबूल खान हे आहे. या चित्रपटाची निर्मिती अली अब्बास जफर, हिमांशू किशन मेहरा आणि झी स्टुडिओनं केली आहे. 'खाली पीली' चित्रपटामध्ये ईशान आणि अनन्याव्यतिरिक्त जयदीप अहलावत, झाकीर हुसेन, अनूप सोनी, सतीश कौशिक हे कलाकार आहेत. चित्रपटाचे संगीत विशाल-शेखर यांनी दिलं आहे. तर गीत कुमार आणि राज शेखर यांनी लिहिली आहेत. कोविड-19मुळं या चित्रपटाला झी प्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आलं होते.

चित्रपटाची कहाणी : 'खाली पीली' या चित्रपटामध्ये पूजा (अनन्या पांडे) आणि ब्लॅकी (ईशान खट्टर) काही कारणामुळं बालपणी एकमेकांपासून वेगळे होतात. पूजा एका बदनाम रस्त्यावर आहे, जी वयाच्या 18 व्या वर्षी चोरीच्या पैशांनी भरलेली बॅग घेऊन पळून जाते. त्यानंतर ती ब्लॅकीला भेटते, जो टॅक्सी चालक आहे. पूजा त्याला म्हणते की, वेगानं टॅक्सी चालव. त्यानंतर तो खूप वेगानं कार चालवतो. पूजाच्या मागे गुंड आणि गुंडांच्या मागे पोलीस लागलेले असतात. या चित्रपटाच्या कहाणीत पूजा आणि ब्लॅकी बरोबरच टॅक्सीचीसुद्धा करामत आहे.

राजा हिन्दुस्तानी : हा चित्रपट 15 नोव्हेंबर 1996 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन नदीम-श्रवण जोडीनं केलं. 'राजा हिन्दुस्तानी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 76.34 कोटीची कमाई केली होती.

चित्रपटाची कहाणी : राजा (आमिर खान) एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तो आरती ( करिश्मा कपूर ) या श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी लग्न करतो. नंतर, तिची सावत्र आई या जोडप्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. या चित्रपटाची कहाणी ही पूर्ण राजा आणि आरतीभोवती फिरणारी आहे.

टॅक्सी चोर : टॅक्सी चोर हा 1980 चा सुशील व्यास दिग्दर्शित हिंदी-भाषेतील भारतीय अ‍ॅक्शन चित्रपट आहे, ज्यात मिथुन चक्रवर्ती, जरीना वहाब, भारत भूषण आणि जगदीप यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन बप्पी लाहिरीनं केलं.

चित्रपटाची कहाणी : राजेश (मिथुन चक्रवर्ती) एक चोर आहे, जो टॅक्सी चोरी आणि विक्रीचा व्यवहार करत असतो. तो त्याची आई आणि मोठा भाऊ इन्स्पेक्टर ब्रिजेश (बृजेश त्रिपाठी) यांच्यासोबत राहत असतो. रितेश (मिथुन चक्रवर्ती) हा रुबी (झरीना वहाब) प्रेमात पडतो. या चित्रपटाची कहाणी रितेश आणि रुबी यांच्या भोवती फिरणारी आहे.

हेही वाचा :

  1. Ananya Panday birthday : सुहाना खान आणि शनायानं 'बेस्टी' अनन्याला दिल्या वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा
  2. Urfi Javed : उर्फी जावेदनं 'भूल भुलैया' चित्रपटातील राजपाल यादवच्या छोटा पंडितच्या पात्राची केली कॉपी...
  3. Chiyaan 62 : तमिळ स्टार चियान विक्रमनं केली 'चियान 62' चित्रपटाची घोषणा ; व्हिडिओ केला पोस्ट
Last Updated : Oct 30, 2023, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details