मुंबई : अभिनेता सलमान खानने गुरुवारी इंस्टाग्रामवर आपल्या जखमी शरीराचा फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये सलमान कॅमेऱ्याकडे पाठीमागे शर्टलेस पोज देताना दिसत आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर पाठीच्या मध्यभागी 'एक्स' चिन्हांकित करणारी एक मोठा किनेसियोलॉजी टेप आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर वेदना कमी करणारा पॅच असलेला त्याच्या पाठीचा फोटो त्याने शेअर केला. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही जगाचे वजन तुमच्या खांद्यावर घेऊन जात आहात, तेव्हा तो म्हणतो जगाला चार पाच किलो डंबेल उठवून दाखवा. (जग सोडा, 5 किलोचा डंबेल उचला) टायगर जख्मी आहे. आणि 'हॅशटॅग, टायगर3' असे त्यांनी लिहले. आहे.
सलमान खान झाला जखमी : सलमान खानने फोटो शेअर करताच त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सलमान काळजी घे,’ अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर यूजर करत आहे. एकाने सलमानला कमेंट केली की, 'सलमान भाईजान लवकर बरा व्हा,' आणखी एकाने लिहिले, 'भाईजान काळजी घ्या', यशराज फिल्म्स द्वारे टायगर 3, या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ ही झोयाच्या भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटात कतरिना कैफ ही एक पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून दिसणार आहे. तसेच सलमान खान या चित्रपटात भारतीय गुप्तहेर म्हणून असणार आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित, अॅक्शन थ्रिलर चित्रपट सिनेमागृहामध्ये नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.