महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Merry Christmas V/s Yodha : कतरिना कैफच्या 'मेरी ख्रिसमस'चा सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा'शी सामना अटळ - कतरिना कैफ

कतरिना कैफचा आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रपट नाताळच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' चित्रपटाशी 'मेरी ख्रिसमस'चा सामना होणे आता अटळ बनले आहे. डिसेंबर महिन्यात बॉलिवूडचे अनेक महत्त्वाचे आणि मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Katrina Kaif's upcoming movie 'Merry Christmas'
'मेरी ख्रिसमस' चित्रटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

By

Published : Jul 17, 2023, 1:23 PM IST

मुंबई - कतरिना कैफच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' चित्रटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. हा चित्रपट यंदाच्या नाताळच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 'मेरी ख्रिसमस' १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सितुपती पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. हिंदी आणि तमिळ या दोन्ही भाषामध्ये वेगवेगळ्या सहाय्यक कलाकारांसह चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचे हिंदी पोस्टर

मेरी ख्रिसमसच्या हिंदी भाषेच्या आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कानन आणि टिनू आनंद त्याचवेळी तमिळ चित्रपटात याच भूमिका राधिका सरथकुमार, षण्मुगाराजा, केवीन जय बाबू आणि काजेश विल्यम्स साकारत आहेत. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामध्ये बालकलाकार परी, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे कॅमिओ भूमिका साकारताना दिसतील. रमेश तौरानी, जया तौरानी, संजय रौत्रे आणि केवल गर्ग यांनी 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाची निर्मिती टीप्स फिल्म्स आणि मॅचबॉक्स पिक्चर्ससाठी केली आहे.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाचे तमिळ भोषेतील पोस्टर

धर्मा प्रॉडक्शनने निर्मिती केलेला सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'योद्धा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १५ डिसेंबर ठरवली आहे. त्यामुळे कतरिनाचा मेरी ख्रिसमस आणि सिद्धार्थचा 'योद्धा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार हे आता निश्चित झाले आहे. डिंसेबर महिन्यात अनेक मोठे चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे निर्मात्यांची झोप उडायची वेळ आली आहे. विकी कौशल, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका असलेला मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. विशेष म्हणजे कॉमेडी फ्रँचायझी 'फुक्रे'चा तिसरा भाग १ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांचा रणबीर कपूर आणिरश्मिका मंदान्ना स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटदेखील १ डिसेंबरला पुढे ढकलण्यात आला आहे. शाहिद कपूर आणि कृती सेनॉन स्टारर 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. शाहरुख खानचा हा महत्वकांक्षी चित्रपट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details