महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kerala Story release in Kerala : केरळमध्ये पोलीस बंदोबस्तात द केरळ स्टोरीचे प्रदर्शन सुरू - द केरळ स्टोरी

द केरळ स्टोरी हा चित्रपट आज केरळ राज्यात प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत सुमारे 20 केंद्रांवर चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सिनेमाचे प्रदर्शन सुरू आहे.

Kerala Story release in Kerala
पोलीस बंदोबस्तात द केरळ स्टोरीचे प्रदर्शन सुरू

By

Published : May 6, 2023, 4:50 PM IST

तिरुअनंतपुरम/कोझिकोड: द केरळ स्टोरी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासून चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. सत्यकथावर आधारित चित्रपट असल्याचा दावा निर्मात्यांच्या वीने केला जात असला तरी ही कथा अनेक चुकीच्या तपशीलानी भरलेली व अतिरंजीत असल्याचा आरोप होत आला आहे. या चित्रपटावर बंदी आणली जावी यासाठी अनेक तक्रारी झाल्या होत्या व काही तक्रारींची सुनावणी न्यायालयातही पार पडली. या पार्श्वभूमीवर हा सिनेमा ५ एप्रिल रोजी देशातील इतर राज्यासह केरळमध्येही प्रदर्शित झाला. केरळमधील 20 केंद्रांवर या चित्रपटाचा विशेष शो होता. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ठिकठिकाणी प्रचंड आंदोलन करण्यात आले. विरोध पाहता बहुतांश चित्रपटगृहांमध्ये शेवटच्या क्षणी प्रद्रशन पुढे ढकलण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व चित्रपटगृहांसमोर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

केरळमध्ये पोलीस बंदोबस्तात द केरळ स्टोरीचे प्रदर्शन सुरू

केरळमध्ये पोलीस बंदोबस्तात द केरळ स्टोरीचे प्रदर्शन- आज केरळमध्ये 'द केरळ स्टोरी' प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती आणि पोलिसही सतर्कतेच्या अवस्थेत गस्त घालताना सावध दिसले होते. श्वान पथकासह पोहोचलेल्या पथकाने मुख्य चित्रपटगृहांची तपासणी केली आणि त्यानंतरच शो सुरू झाला. .कोझिकोडमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात तरुणांचा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स ढकलण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करत त्यांना अटक करून तेथून हटवले.

द केरळ स्टोरीवरुन राजकारण - सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अनेक अनुभवी कलाकार आहेत. चित्रपटात अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली होती, तर योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी, विजय कृष्णा, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील भाषणादरम्यान चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, द केरळ स्टोरी हे देशविरोधी कारस्थान उघडकीस आले आहे, ही घटना काँग्रेसच्या साथीमुळेच होऊ शकल्याने काँग्रेसचा कर्नाटकात पराभव करण्याचे आवाहनही मोदींनी केले.

हेही वाचा -वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन राजकारण तापले

ABOUT THE AUTHOR

...view details