हैदराबाद: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटातून आता प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाला आहे. अदा आणि 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामधील कलाकार तेलंगणातील करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेत सहभागी होणार होते. पण त्यांचा रस्त्याचं अपघात झाला. यामुळे टीमला कार्यक्रम रद्द करावा लागला. अदाने याबद्दलची माहीती सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन दिली आहे. अदा ट्विटमध्ये म्हणते की, मित्रांनो मी सुखरुप आहे. माझी काळजी करु नका. अपघाताच्या बातमीचे वृत्त सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले आहे. त्यातून नको त्या गोष्टी पसरु नये म्हणून यासाठी अदाने चाहत्यांशी संवाद साधला.
अदाने अपघाताची दिली माहिती : त्यानंतर अदाने सांगितले की, आमच्या टीममधील सहकाऱ्यांनी तातडीनं सोशल मीडियावर याबद्दलचे अपडेट्स देण्यास सुरुवात केली. हा अपघात कसा घडला याविषयीची अजूनपर्यत काही माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे या घटनेविषयी सध्या पोलीस तपास करत आहे. अदाच्या चाहत्यांना याबद्दल वृत्त समजल्यावर तिला काळजी घेण्याचे मॅसेज केले. या अपघातात केरळ स्टोरीची पूर्ण टीम सुखरुप आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये मोठा चर्चेत होता. या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने बंदी लावली होती. तर तामिळनाडूमधील मल्टिप्लेक्सने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात या चित्रपटाला करमुक्त घोषित केला आहे.