महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Great Indian Family box office: विकी कौशलची जादु चालली नाही, द ग्रेट इंडियन फॅमिलीची खराब सुरुवात - द ग्रेट इंडियन फॅमिली बॉक्स ऑफिस

The Great Indian Family box office: विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या द ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात केली. विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित या कौटुंबीक कॉमेडी चित्रपटाला पहिल्या आठवड्याच्या अखेरीस लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक असणार आहे.

The Great Indian Family box office:
द ग्रेट इंडियन फॅमिलीची खराब सुरुवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 1:09 PM IST

मुंबई - The Great Indian Family box office: विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या द ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपटाची भारतीय बॉक्स ऑफिसवर आव्हानात्मक सुरुवात झाली. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. या चित्रपटाच्या प्रमोशनवर फार भर न दिल्याचा हा एक परिणाम असावा. या चित्रपटाला मिळालेली स्क्रिन संख्याही तुलनेत कमीच आहे. त्यामुले याचा परिणाम पहिल्या दिवशीच्याा बॉक्स ऑफिस कमाईवर थेट झाला आहे. पहिल्या दोन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून प्रेक्षकांनी पूर्णपणे नकार दिल्याचं स्पष्ट झालंय.

ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपटाचं भवितव्य आता पूर्णपणे प्रेक्षकांच्या हाती आहे. ते बाहेर जाऊन कशी माऊथ पब्लिसिटी करतात व आठवड्याच्या अखेरीस कमाईत किती भर पडते यावर सर्व काही अवलंबून आहे. सुरुवातीला जशी चित्रपटाबद्दल सकारात्मक चर्चा होती तशीच विकेंडला सकारात्मक चर्चा घडू शकली तर चित्र बदलू शकतं, तरी ही सकारात्मक चर्चा बॉक्स ऑफिसवर टिकून राहते की नाही हे पाहणे बाकी आहे.

दुसऱ्या दिवशी द ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपट भारतात 1.50 कोटी कमावण्याची शक्यता असल्याचं इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजांनी सूचवलं होतं. भारताच्या मार्केटमध्ये 1.4 कोटीची कमाई म्हणजे पहिल्या दिवसाच्या तुलनेत नाममात्र वाढ आहे. 40 कोटी रुपयांच्या कथित बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला फायदा मिळविण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

या चित्रपटाच्या तुलनेत, विकी कौशलचा या आधी रिलीज झालेल्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटानं लक्षणीय यश मिळवलं होतं, अगदी कमी थिएटरमध्ये रिलीज होऊनही बॉक्स ऑफिसच्या अपेक्षा ओलांडल्या होत्या. असं असलं तरी द ग्रेट इंडियन फॅमिली चित्रपट उत्तम सुरुवात करु शकलेला नाही. यशराज फिल्म्स द्वारे बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचाही मोठा फटका बसला आहे. हा चचित्रपट सलग तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. प्रेक्षक सिनेमाची निवड करताना जवानला प्राधन्य देताना दिसतात.

ABOUT THE AUTHOR

...view details