महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Great Indian Family : द ग्रेट इंडियन फॅमिलीचा संथ सुरुवातीनंतर होईल धमाका - मानुषी छिल्लरचा द ग्रेट इंडियन फॅमिली

The Great Indian Family : अभिनेता विकी कौशल आणि मानुषी छिल्लरचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई कशी असेल आणि या आठवड्याच्या अखेरीस त्यात कशी भर पडू शकेल याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत.

The Great Indian Family
द ग्रेट इंडियन फॅमिली

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 12:15 PM IST

मुंबई- The Great Indian Family : विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांच्या मुख्य भूमिका असलेला द ग्रेट इंडियन फॅमिली हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज (२२ सप्टेंबर) चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात यात मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, यशपाल शर्मा, सादिया सिद्दीकी, अलका अमीन, सृष्टी दीक्षित, भुवन अरोरा, आसिफ खान, आशुतोष उज्ज्वल आणि भारती परवानी यांच्याही व्यक्तीरेखा पाहायला मिळतील. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसकडून कमाईच्या खूप अपेक्षा आहेत.

द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट या वीकेंडला भारतातील अंदाजे 1000 स्क्रीनवर झळकणार आहे. पुढील आठवड्यात अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट एक उत्तम पर्याय असू शकतो. याचा विचार करुन स्क्रिन संख्या वाढवण्याचाही विचार वितरकांचा आहे. बुधवार पासून या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झालीय. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या तीन नॅशनल चेनमध्ये चित्रपटाची सुमारे 8,000 तिकिटे विकली गेली आहेत.

सुरुवातीच्या अंदाजानुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 2 कोटी रुपयांची कमाई करेल. शनिवारी आणि रविवारी कमाईत वाढ होईल आणि पहिल्या आठवड्या अखेरीस एक चांगला आकडा कमाईत प्राप्त होईल.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माता आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या कौटुंबिक कॉमेडी-ड्रामामध्ये विक्की कौशल हा एक धार्मिक हिंदू माणूस दाखवण्यात आलाय. नंतर त्याला कळतं की तो जन्माने मुस्लिम आहे आणि तिथून काही अनपेक्षित गोष्टी घडायला सुरुवात होते. या चित्रपटासमोर मोठी स्पर्धा असणार नाही असा अंदाज निर्मात्यांचा आहे. त्यामुले प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्याच चित्रपटाला यश मिळू शकेल.

काही दिवसापूर्वी 'द ग्रेट इंडियन फॅमिली'चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात विकी कौशल वेद व्यास त्रिपाठी उर्फ भजन कुमार ही व्यक्तीरेखा साकारत असून तो पंडित कुटुंबाचा सदस्य आहे. भक्तीगीते गाण्याचा छंद असलेल्या वेद व्यासच्या जीवनात एक नवं वादळ निर्माण होतं. त्याला एका अज्ञात व्यक्तीचं पत्र येत आणि तो मुस्लिम असल्याचा दावा केला जातो. याचा धक्का पंडित कुटुंबाला बसतो. अशा वेगळ्या विषयावरील रंजक कथा प्रेक्षकांन गुंतवून ठेवणारी असेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -

१.Parineeti Raghav Wedding: राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा उदयपूरमध्ये दाखल, 'रागनिती' लगीनघाईला सुरुवात

२.Anil Kapoor Animal First Look : 'अ‍ॅनिमल का बाप बलबीर सिंग'... अनिल कपूरचा 'अ‍ॅनिमल' फर्स्ट लूक

३.Rashmika Mandanna Trolled : रश्मिका मंदान्ना ड्रेसवरुन ट्रोल, पाहा तिचा एअरपोर्ट लूक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details