मुंबई - Koffee With Karan 8: करण जोहरचा शो 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणनंतर देओल ब्रदर्सनं हजेरी लावली आहे. दरम्यान करणच्या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला. या प्रोमोमध्ये करण जोहर बॉबी देओल आणि सनी देओलसोबत अनेक विषयावर बोलताना दिसत आहे. संवादादरम्यान करण जोहरनं देओल ब्रदर्सच्या यशाबद्दल स्टँडिंग ओव्हेशन दिलं. याशिवाय त्यानं धर्मेंद्रच्या लिप किसवरही प्रश्न विचारला आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. करण जोहरनं सनी देओलसोबत 'गदर'2च्या कलेक्शनबद्दल बोलताना विचारले की, 'गदर 2'च्या कलेक्शनबद्दल तुम्ही कसे म्हणालात की हे आमचे ऑर्गेनिक कलेक्शन आहे, मग ते आमचे नाही का? या प्रश्नाचे उत्तर देताना सनी आधी हसतो आणि म्हणतो, 'तसं नाहीये, पण आजकाल सगळे तेच करतात'
'कॉफी विथ करण'मध्ये देओल ब्रदर्स करणार धमाल : या प्रोमोमध्ये तिघेही खूप मस्ती करताना दिसत आहेत. दोन्ही भाऊ करणच्या सर्व प्रश्नांची मजेशीरपणे उत्तरे देत आहेत. बॉबी आणि सनी देओलनं 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये धर्मेंद्रच्या लिप लॉकवर प्रतिक्रिया देत म्हटलं, 'आम्ही सुद्धा किसबाबत विनोद करत बोलत असतो की, बाबा ज्या प्रकारे किस करत आहेत ते पाहाण्यासारखे आहे. या सीनमध्ये ते खूप छान दिसत आहेत'. त्यानंतर सनी म्हणतो की, 'माझे वडील त्यांना हवे ते करू शकतात आणि काही केल्यावर ते त्यातून दूर जातात' हे सांगून तिघेही हसायला लागतात.