महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'टायगर 3'च्या यशानंतर सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर - करण जोहर

Salman Khan : सलमान खान आता 'टायगर 3'नंतर 'द बुल' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये भाईजान आर्मी ऑफिसरची भूमिका साकारेल.

Salman Khan
सलमान खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 10:56 AM IST

Updated : Nov 25, 2023, 2:53 PM IST

मुंबई - Salman Khan : सलमान खान त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. भाईजानचे चाहते त्याच्या चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत. या चित्रपटानं जगभरात 400 कोटींचा टप्पा ओलांडलाय. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 300 कोटीचे कलेक्शन करण्याच्या मार्गावर आहे. यशराज स्पाय युनिव्हर्सचा 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ, इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशन कॅमिओ केला आहे. दरम्यान भाईजानबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानचा आणखी एक चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खाननं आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं : सलमान खाननं अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल खुलासा केला. सलमानच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक 'द बुल' असं असेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'चा आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटासाठी सलमान आपले केसही कमी करणार आहे. 'द बुल' या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वर्धन हे करणार आहेत. हा चित्रपट 2024 च्या ईदमध्ये प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. 'द बुल' हा ब्रिगेडियर फारूक बुलसाराचा जीवनपट आहे, ज्यांनी 1988 मध्ये मालदीवमध्ये ऑपरेशन कॅक्टसचं नेतृत्व केलं होतं. सलमान 25 वर्षांनंतर करण जोहरसोबत काम करेल.

भाईजानचे आगामी चित्रपट : सलमाननं करणसोबत 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. हा चित्रपट 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. 'कुछ कुछ होता है'मध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या, मात्र सलमान खाननं या चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'दबंग'चा आगामी भाग, 'किक'चा सिक्वेल आणि सूरज बडजात्याचा 'प्रेम की शादी' यासह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सलमान खाननं 24 नोव्हेंबर रोजी वडील सलीम खान यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला. तसेच, या खास दिवशी, त्यानं त्याच्या वडिलांसोबतचा एक अप्रतिम फोटोदेखील शेअर केला होता.

हेही वाचा :

  1. सलीम खान यांचा 88 वा वाढदिवस, 'माय टायगर' म्हणत, सलमाननं दिल्या शुभेच्छा
  2. तीन वर्षाच्या मुलीसह जीव मुठीत घेऊन धावणाऱ्या बापाची गोष्ट : 'जोराम'चा ट्रेलर लॉन्च
  3. 'त्रिशा, प्लिज मला माफ कर', म्हणत मन्सूर अली खाननं मागितली माफी
Last Updated : Nov 25, 2023, 2:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details