मुंबई - The Archies :'द आर्चीज' चित्रपटाचा प्रीमियर मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह अगस्त्य नंदाला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमाला पोहोचले होते. याशिवाय या प्रीमियरला शाहरुख खाननेही कुटुंबासह हजेरी लावली होती. या प्रीमियरला रणबीर कपूर, कतरिना कैफ, रणवीर सिंग, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया, रेखा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
जया बच्चन पापाराझींवर रागवल्या :अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि त्यांची नातवंडं अगस्त्य नंदा, नव्या नवेली, आराध्या आणि मुलगी श्वेता बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह 'द आर्चिज'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र पाहून पापाराझीनं सर्वांचे फोटो क्लिक केले. दरम्यान, जया बच्चन रेड कार्पेटवर टीना अंबानीसोबत होत्या. जया बच्चन यांचे फोटो पापाराझी क्लिक करत होते, यावेळीच त्या पॅप्सवर भडकल्या. जया यांनी पापाराझीला फोटो काढताना आवाज न करण्यास सांगितलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर आता अनेकजण सोशल मीडियावर जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत.