मुंबई - Thalaivar 170 : रजनीकांतचा आगामी चित्रपट, 'थलैवर 170', चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 'थलैवर 170' चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम टीजे ज्ञानवेल करणार आहे. या चित्रपटाबाबत रजनीकांत खूप उत्सुक आहे. 'थलैवर 170' चित्रपटामध्ये रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता या चित्रपटाबाबत एक बातमी समोर येत आहे. रजनीकांत स्टारर 'थलैवर 170'च्या निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाच्या टीमबाबत अधिकृत घोषणा केली आहे. 'थलैवर 170' मध्ये अनिरुद्ध रविचंदर हा या चित्रपटाला संगीत देईल आणि तसेच या चित्रपटाचे निर्माते सुबास्करन असतील.
थलैवर 170 :हा शीर्षक नसलेला चित्रपट एक अॅक्शन-पॅक एंटरटेनर असेल अशी अपेक्षा केली जात आहे, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांतची अनोखी शैली दिसून येईल. या चित्रपटाची कहाणी काय असेल याबाबत अद्याप अधिकृत काहीही माहिती समोर आले नसले तरी, रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. थलैवर 170मध्ये रजनीकांतसोबत अमिताभ बच्चन दिसेल असं देखील बोललं जात आहे. 32 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोघेही एकत्र दिसेल. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी 'हम', 'अंधा कानून' आणि 'अटक' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन स्पेस शेअर केली आहे. दरम्यान रजनीकांत 'थलैवर 170' चित्रपटासाठी प्रसिद्धीच्या झोतात आहेत.