हैदराबाद- तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा यांचे सोमवारी 23 जानेवारी निधन झाले आहे. या अभिनेत्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. सुधीरच्या आत्महत्येनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
अभिनेता सुधीर वर्मा हा तेलुगु चित्रपटसृष्टीतील अभिनेता होता. त्याने सेकंड हँड आणि कुंदनापू बोम्मा सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्याच्या निधनानंतर त्याचे सहकलाकार व तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
तरुण अभिनेता सुधीर वर्माच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, सुधाकर कोमाकुला यांनी ट्विट केले, "सुधीर! इतका सुंदर आणि प्रेमळ माणूस' भाऊ तुला ओळखून आणि तुझ्यासोबत काम करताना खूप आनंद झाला! तू आता नाहीस हे सत्य पचनी पडू शकत नाही! ओम शांती. !"
सुधीर वर्माने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या निखिल सिद्धार्थ आणि स्वाती रेड्डी अभिनीत स्वामी रा रा या चित्रपटातून पदार्पण केले. नागा चैतन्य आणि क्रिती सॅनॉन यांच्या दोहछाय चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. नंतर त्याने ईशा कोपीकर, निखिल सिद्धार्थ आणि रितू स्टारर चित्रपटात केशवाचे दिग्दर्शन केले.