मुंबई- दिग्दर्शक समीर विद्वांस यांची रोमॅन्टिक प्रेम कथा असलेल्या सत्य प्रेम की कथा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. टिझर जेव्हा सुरू होतो तेव्हा डोळ्यांना सुद गारवा देणारी दृष्ये, निसर्गाचे अलौकिक सौंदर्य आणि यात रंगत चाललेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या रोमान्स पडद्यावर दिसतो. पार्श्वसंगीतामध्ये एक सुखद हळवी कविता ऐकू येत राहते. ही कविता अशी आहे..
बाते जो कभी पूरी न हो
वादे जो कभी अधूरे ना हो
हसी जो कभी कम नम ना हो
आँखे कभी नम न हो
और अगर हो...तो इतना जरुर हो
आँसू उसके हो पर आँखे मेरी हो..
या सत्य प्रेम की कथा चित्रपटाच्या टिझरमधून यावर्षी एक म्यूझिकल रोमान्सचा अनुभव देणार असल्याची खात्री आपल्याला दिग्दर्शक देतो आणि सादर होणाऱ्या कथेतील दृष्यातून त्याची आपल्याला खात्रीही पटते.
समीर विद्वांस दिग्दर्शित सत्य प्रेम की कथा - साजिद नाडियादवाला निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित सत्य प्रेम की कथा चित्रपट शूटिंगच्या सुरुवातीपासून चर्चेत होता तो त्याच्या शीर्षकामुळे. सत्यनारायण की प्रेमकथा हे नाव सुरुवातीला ठेवण्यात आले होते. पण एकंदरीत या नावावरुन कोणताही वाद होऊ नये असा विचार निर्मात्यांननी केला आणि चित्रपटाचे नाव बदलून सत्य प्रेम की कथा असे करण्यात आले.या चित्रपटाची प्रदर्शन तारीखही जाहीर करण्यात आली होती. नमाह पिक्चर्सचा समीर विद्वांस दिग्दर्शित बहुप्रतिक्षित सत्यप्रेम की कथा हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुम्हा एकत्र - सत्यप्रेम की कथा ही संगीतमय प्रेमकथा आहे ज्याची घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी याची हिट जोडी भूल भुलैया २ नंतर पुन्हा एकदा एकत्रीत पडद्यावर दिसणार आहेत. रुपेरी पडद्यावरील त्यांची केमेस्ट्री नेहमीच हिट ठरत आली आहे. दोघांना पडद्यावर एकत्र पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते.
हेही वाचा -Anushka Sharma News : हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे महागात; वाहतूक पोलिसांनी अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डला ठोठावला दंड