महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'निडर, अग्निमय' दीपिका पदुकोणसाठी 'फायटर'च्या टीमनं शेअर केली वाढदिवसाची लक्षवेधी पोस्ट - दीपिका पदुकोण भूमिका

'फायटर' चित्रपटाच्या टीमने त्यांची 'निडर' पायलट दीपिका पदुकोणच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या भूमिकेचे अनेक पैलू दिसून येतात.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 1:17 PM IST

मुंबई - दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त आगामी 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 'फायटर'च्या टीमनं एक आकर्षक व्हिडिओ शेअर करत चित्रपटातील पडद्यामागील काही आनंददायक क्षणांची झलक यात दाखवण्यात आली आहे. प्रत्येक क्लिपमध्ये दीपिकाच्या व्यक्तिमत्त्वाची अद्वितीय वैशिष्ट्य हायलाइट करण्यात आली आहेत.

मार्फलिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या फायटरच्या टीमनं दीपिकाचा 38 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शन लिहिले आहे, "निर्भय, अग्निमय, फायटर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीपिका पदुकोण!"

एरियल अ‍ॅक्शन-पॅक्ड थ्रिलर 'फायटर' चित्रपटामध्ये दीपिकाने स्क्वाड्रन लीडर मीनल राठौरची भूमिका साकारली आहे. एअर ड्रॅगन युनिटमध्ये स्क्वाड्रन पायलट म्हणून ती आपल्या लवचिकता आणि शौर्याचे दर्शन घडवताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या भूमिकेतून दीपिका हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदार्पण करत आहे. चित्रपटातील दीपिकांचे मीनल हे पात्र धैर्य, दृढनिश्चय आणि एका लढवय्याच्या अथक आत्म्याचे प्रतीक आहे.

'फायटर'च्या प्रमोशनल साहित्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. टीझरपासून ते 'शेर खुल गए आणि इश्क जैसा कुछ' या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे चाहते 'फायटर'च्या ट्रेलरच्या लॉन्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदा दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन स्क्रिन स्पेस शेअर करत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

'फायटर' व्यतिरिक्त दीपिका पदुकोणकडे प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' हा साय-फाय अ‍ॅक्शन फिल्म आहे. रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटात ती पुन्हा काम करणार आहे. दीपिका पदुकोण हॉलिवूड चित्रपट 'द इंटर्न'च्या हिंदी रूपांतराचे शीर्षक आणि निर्मिती देखील करणार आहे. तिच्या होम प्रॉडक्शनमध्ये अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा -

  1. ''थोडं गूढ आहे पण छान आहे'' म्हणत, इलियाना डिक्रूझने मायकेल डोलनसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा
  2. करीनासह सैफ स्वित्सर्लँडमधून परतला, छोट्या जेहनं वेधलं लक्ष
  3. मेहनतीच्या जोरावर दीपिका पदुकोणनं गाठलं यशाचं शिखर

ABOUT THE AUTHOR

...view details