अभिनेत्री ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने और प्यार हो गया या चित्रपटातून 1997 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. तिला अनेकवेळा 'जगातील सर्वात सुंदर स्त्री' म्हणून औळखले जाते. और प्यार हो गया चित्रपटापासून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आली आहे. हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास आणि जोधा अकबर हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. तिचा अभिनयाचा प्रवास केवळ बॉलीवूडपुरता मर्यादित राहिला नाही कारण तिने हॉलीवूडमध्ये ब्राइड अँड प्रिज्युडिस, प्रोव्होक्ड, यासह इतर काही चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.
निळ्याशार डोळ्यांची प्रतिभावान अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलिकडेच रिलीज झालेल्या पोन्नीयन सेल्वन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यातील तिचे सौंदर्य पाहून काही इंटरनेटवर तिला ट्रोल करण्यात आले. तिने आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केल्याचा तर्क युजर्स लावत होते. खरंतर ऐश्वर्या रायच्या बाबतीतला हा काही पहिला वाद नाही. यापूर्वीही ती अनेक वादांच्या केंद्रस्थानी होती.
वादाच्या भोवऱ्यात अडकली होती ऐश्वर्या राय- सौंदर्यासोबतच ऐश्वर्या तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि वादांसाठीही ओळखली जाते. ऐश्वर्या कधी सलमान खानसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती तर कधी अभिनेत्री चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेमुळे चर्चेत आली होती. ऐश्वर्या रायच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचे सलमान खानसोबतचे ब्रेकअप. हम दिल दे चुके सनम या चित्रपटानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये आले. पण सलमान खानच्या आक्रमक स्वभावामुळे हे नाते 2001 मध्ये ब्रेकअपमध्ये संपले.
सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये आली. विवेकने मीडियासमोर सांगितले होते की, सलमान खान मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी त्याला ऐश्वर्यापासून दूर राहण्यास सांगतल्याचेही विवेक म्हणाला होता. पण विवेकच्या या बालिश कृत्यामुळे ऐश्वर्यानेच विवेकसोबतचे नाते तोडले.
अनेक चेहरे प्लास्टिक सर्जरी अफवा - ऐश्वर्या राय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली जेव्हा ती मणिरत्नमच्या PS1 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचली. ऐश्वर्याच्या वेगळ्या लूकमुळे तिने प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली होती.