महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sachin Shroffs Marriage : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला - शैलेश लोढा ऐवजी नवीन तारक मेहताची भूमिका

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता सचिन श्रॉफने शनिवारी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. तारक मेहतामध्ये बबिता या व्यक्तीरेखेमुळे परिचित असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्यातील काही झलक शेअर केली.

सचिन श्रॉफचा विवाह
सचिन श्रॉफचा विवाह

By

Published : Feb 27, 2023, 11:40 AM IST

मुंबई - लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारक मेहताची भूमिका करणारा अभिनेता सचिन श्रॉफने शनिवारी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. तारक मेहतामध्ये बबिता या व्यक्तीरेखेमुळे परिचित असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर विवाह सोहळ्यातील काही झलक शेअर केली.

सचिन श्रॉफचा विवाह

मुनमुन दत्ताने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये वधू आणि वर पोज देताना दिसत आहेत. 'आमचा देखणा दुल्हा आणि त्याचा सुंदर दुल्हन,' तिने फोटोला कॅप्शन दिले.

सचिन श्रॉफचा विवाह

दुसर्‍या फोटोत मुनमुनने एक सेल्फी शेअर केला ज्यामध्ये ती दिलीप जोशीसह 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या स्टार कास्टसोबत दिसू शकते.

तारक मेहताची भूमिका :सचिन श्रॉफने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये तारक मेहताची भूमिका साकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिनच्या बहिणीची मैत्रीण असलेल्या चांदनीसोबत सचिन श्रॉफने लग्न केले. सचिन श्रॉफची पत्नी ही त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. सचिन आणि जुही परमार यांच्या घटस्फोटानंतर श्रॉफ कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव सचिनसमोर ठेवला होता. यावर सचिनने खूप विचार केला आणि लग्नास होकार कळवला होता. सचिनची पत्नी चांदनी ही इंटिरियर डिझायनर आहे. सचिन श्रॉफ आणि जुही परमार हे आता विभक्त झाले आहेत. एका टीव्ही मालिकेच्या शुटिंग दरम्यान सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि 15 फेब्रुवारी 2009 रोजी जयपूरमध्ये त्यांनी लग्न बांधली होती. 27 जानेवारी 2013 रोजी त्यांच्या संसारात गोड मुलीचे आगमन झाले होते.

सचिन आणि जुहीचा घटस्फोट - सचिन आणि जुहीमध्ये किरकोळ भांडण होऊ लागले. २०१७ नंतर त्यांच्यातील तेढ वाढत गेली आणि अखेर जुही परमारनेच जानेवारी 2018 मध्ये सचिनसोबत घटस्फोटाची घोषणा केली. सचिन आणि जुहीचा घटस्फोट परस्पर संमतीने, सौहार्दपूर्ण आणि सन्माननीय रीतीने झाला असल्याचे नंतर दोघांनीही सांगितले होते. आपल्यावरील जुहीचे प्रेम संपल्याचे किंवा ती प्रेमच करत नसल्याचा दावा घटस्फोटानंतर सचिनने केला होता. जुही परमारला घटस्फोटानंतर सचिन श्रॉफने केलेले आरोप मान्य नव्हते. त्यांची ९ वर्षांची मुलगी समायरासाठी फ्लॅट दिल्याचा दावाही तिने खोडला होता. ती म्हणाली होती की त्यावर कर्ज आहे आणि ते आपल्याला फेडावे लागणार आहे. तारक मेहता शो शिवाय व्यतिरिक्त सचिन प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीच्या 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसला होता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या आधी, ज्यामध्ये त्याने शैलेश लोढा ऐवजी नवीन तारक मेहताची भूमिका केली होती, त्याने 'घुम है किसीके प्यार में' मध्ये राजीवची भूमिका साकारली होती.

हेही वाचा -Champions Of Change Award 2021 : जुही चावला आणि आर माधवन यांना दिल्लीत चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार 2021 ने सन्मानित

ABOUT THE AUTHOR

...view details