महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Taali Release Date OUT :श्रीगौरी सावंतच्या ट्रान्सजेंडर भूमिकेत सुश्मिता सेन, पाहा टीझर - ताली

सुष्मिता सेनचा आगामी 'ताली' चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. या खास दिवशी हा चित्रपट सिनेमागृहात नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

Taali Release Date OUT
ताली चित्रपटाची डेट समोर आली

By

Published : Jul 29, 2023, 3:15 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी 'ताली' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात ती एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 'ताली' चित्रपटात सुष्मिता सेन पहिल्यांदा ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील सुष्मिताचा ट्रान्सजेंडरमधील लूक फार पूर्वीपासूनच समोर आला होता. तेव्हापासून सुष्मिताचे चाहते तिच्या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या चित्रपटात सुष्मिता ही रूपेरी पडद्यावर सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांची भूमिका साकारत असून या चित्रपटासाठी ती फार उत्सुक आहे. अलीकडेच सुष्मिता सेनने एका पोस्टमध्ये सांगितले होते की, 'ताली' चित्रपटाची रिलीज डेट लवकरच जाहीर केली जाईल.

ओटीटी प्रदर्शित होणार :सुष्मिता सेनने चित्रपटाच्या रिलीज डेटचा खुलासा करणारा एक टीझरही शेअर केला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नाही आणि थेट ओटीटी रिलीज होईल. 'ताली' चित्रपट रूपेरी पडद्यावर १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. 'ताली' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना, सुष्मिता सेनने तिच्या चाहत्यांसाठी लिहले, 'गाली ते तालीपर्यंतच्या प्रवासाची कहाणी या चित्रपटात दाखवली गेली आहे. 'भारतातील तृतीय पंथी श्रीगौरी सावंत यांच्या लढ्याची कहाणी १५ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर. ताली विनामूल्य पहा.', असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

'ताली' चित्रपटाबद्दल जाणून घ्या : 'ताली' हा चित्रपट ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित बायोपिक चित्रपट आहे. गौरीचे धाडसी कार्य आणि ट्रान्सजेंडर समाजासाठी तिचे अविस्मरणीय योगदान चित्रपटात दाखवले जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. दरम्यान चित्रपटाची रिलीज डेट समोर आल्यानंतर अनेक चाहते या चित्रपटासाठी खूप आतुर आहेl. सुष्मिताच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. सुष्मिताच्या या पोस्टवर एका चाहत्याने लिहले 'तुझ्यावर खूप गर्व आहे' तर दुसऱ्या चाहत्याने लिहले, 'खूप अप्रतिम' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!!
  2. Deepika Padukone and Ranveer Singh : करण जोहरच्या पार्टीत सामील झाले 'हे' कलाकार....
  3. Sanjay Dutt birthday : संजय दत्तच्या वाढदिवशी मान्यताची खास पोस्ट, बनवला आठवणींचा कोलाज

ABOUT THE AUTHOR

...view details