मुंबई :अभिनेत्रीसुष्मिता सेन, सध्याला तिच्या आगामी अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. अखेर आर्या 3 या वेब सीरिजची शूटिंग ही पूर्ण झाली आहे. सुष्मिताने रविवारी तिच्या शुटिंग सेटवरचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, सर्वात अप्रतिम कलाकार आणि क्रू !!! धन्यवाद सर्वांना घट्ट मिठी. माझे तुमच्यावर प्रेम आहे मित्रानो!!!' अशी पोस्ट लिहून तिने काहीजणांना टॅग केली आहे. तसेच व्हिडिओमध्ये, ती दिग्दर्शक राम माधवानीसोबत डान्स करताना दिसत आहे याशिवाय ती तिचा सहकलाकार सिकंदर खेरला मिठी मारताना दिसत आहे.
आर्या 3 : व्हिडिओ अपलोड होताच या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांने कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच या व्हिडिओवर तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी कमेंट केली आहे. सिकंदरने लिहिले, 'जसे ते म्हणतात.. काँगो टू ऑल ऑल!' तर एका वापरकर्त्याने लिहले, 'सीझन 3 पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' तर आणखी एकाने लिहले, 'या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे'. सुष्मिता सेनने डिजिटलमध्ये पदार्पण केल्याने तिचा चाहता वर्ग फार खुश आहे. सुष्मिताने जून 2020 मध्ये 'आर्या' या वेब सीरिजमध्ये काम केले होते. या वेब सीरिजमध्ये ती कठोर महिलेची भूमिका साकारत आहे, जी आपल्या कुटुंबाला गुन्हेगारी जगापासून संरक्षण करण्याच्या प्रयत्नात असते .