मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमी चर्चेत असते. आता अलीकडे तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पाहिल्या गेल्याने त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 2021 मध्ये हे दोघे विभक्त झाले होते. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे ज्यामुळे ते पुन्हा एकत्र येत असल्याच्या अफवा पसरल्या जात आहे. रोहमन, हा लवकरच एका चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहमनने सुष्मिताचे फार कौतुक केले आहे.
सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडने केले तिचे कौतुक : सुष्मिताबद्दल बोलताना, रोहमनने एका मुलाखतीत सांगितले की ती जे काही करते त्यात ती अपवादात्मक आहे आणि तिच्या आसपास राहणे हा एक जबरदस्त शिकण्यासाठीचा अनुभव असतो. 'ती कुठून प्रेरणा घेते हे तुम्ही खरोखरच समजू शकत नाही, तुम्ही फक्त तिच्याभोवती असायला पाहिजे. रोहमन हा सुष्मितापेक्षा 15 लहान आहे. त्यानंतर रोहमन त्यांच्या सहलीबद्दल सांगितले, ज्यामुळे ते पुन्हा डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या आहे, रोहमन पुढे म्हटले, 'आम्ही एकत्र छान दिसतो. आम्ही लोकांसाठी जगत नाही, त्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या गोष्टी करा, लोकांना काय म्हणायचे आहे, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कुणालाही उत्तर देण्याची गरज नाही. लोक जे काही बोलतात त्यावर आम्ही भाष्य करत नाही. आम्ही आमचे आयुष्य जगतो, तेच आहे.'