मुंबई - दाक्षिणात्य स्टार सुर्याने बुधवारी दुजोरा दिला की तो त्याच्या तामिळ चित्रपट सूरराई पोत्रूच्या हिंदी रिमेकमध्ये विशेष भूमिका साकारणार आहे. रीमेकचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करत आहेत, ज्यांनी मूळचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाचा प्रीमियर नोव्हेंबर 2020 मध्ये प्राइम व्हिडिओवर झाला होता.
सुपरस्टार अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. यामध्ये अभिनेत्री राधिका मदन देखील दिसणार आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, सुर्याने अक्षय कुमारसोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, चित्रपटातील त्याच्या "संक्षिप्त कॅमिओ" साठी शूटिंग करताना मला खूप आनंद झाला. "सर, तुम्हाला या भूमिकेत पाहून खूप नॉस्टॅल्जिक वाटले!''