मुंबई - प्रभास स्टारर 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची हवा गरम आहे. २० जुलै रोजी अमेरिकेतील सॅन दिएगो कॉमिक कॉनच्या भव्य मंचावरुन चित्रपटाचे शीर्षक, टीझर ट्रेलर आणि रिलीज तारीख जाहीर केली जाणार आहे. या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर निर्मात्यांनी प्रभासचा फर्स्ट लूकही लॉन्च केला आहे. यात प्रभास जबरदस्त दिसत असून त्याला पाहाताक्षणीच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. या फर्स्ट लूकवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. रिबेल स्टार प्रभासच्या या लूकची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. हिरोचा उदय झाला म्हणत वैजयंती मुव्हिजने त्याचा हा लूक लॉन्च केला आहे.
'प्रोजेक्ट के' चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका कमल हासन साकारत असल्याचे सांगितले जाते. ते कोणती भूमिका साकारत आहेत याची कल्पना आपल्याला २० जुलै रोजी लॉन्च होणाऱ्या टीझरमधून लक्षात येईल. सॅन दिएगो कॉमिक कॉन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी यापूर्वी प्रभास आणि राणा दग्गुबाती अमेरिकेत पोहोचले आहेत. प्रोजेक्ट के चित्रपटाचा बॅनर वैजयंती मुव्हीजने कमल हासनचा एक फोटो शेअर करत उलगा नायगम ( युनिव्हर्सल हिरो ) अमेरिकेत दाखल झाला असल्याचे कळवले आहे.

सुपरस्टार प्रभासने जेव्हा 'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हासन आहे याबद्दल सांगितले होते, तेव्हा त्यांच्यासोबत काम करण्यासाठी तो किती उत्सुक आहे हे जाणवले होते. कमल हासन यांच्याकडून शिकायला मिळेल, असे म्हणत त्याने त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही तो म्हणाला होता.
प्रभाससोबत राणा दग्गुबाती 'प्रोजेक्ट के' इव्हेन्टसाठी अमेरिकेत पोहोचल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत या चित्रपटातील इतर कलाकारांच्या नावाची चर्चा झाली मात्र, यात राणाचे नाव कुठेच नव्हते. 'राणादेखील प्रोजेक्ट के मध्ये आहे का?', असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या दोन 'बाहुबली' स्टारचे यानिमित्ताने रियुनियन अमेरिकेत झाल्याने चाहते सुखावले आहेत.