मुंबई : प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' 16 जून रोजी प्रदर्शित झाला आणि आताही चित्रपटाचा फार विरोध होत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून 600 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अद्याप देशांर्गत 300 कोटींपर्यंत कमाई करू शकलेला नाही. कार्टून टाईप ग्राफिक्स आणि कुरूप संवादांमुळे 'आदिपुरुष'ची देशभरात बदनामी होत आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्याना लोक फार शिव्या देत आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. या चित्रपटाचा विरोध भारतात नाही तर नेपाळमध्ये देखील झाला होता. याशिवाय रामानंद सागरच्या रामायणमधील कलाकारांनी देखील चित्रपटावर टीका केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटावर फार जास्त मीम्स बनविण्यात आले होते. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होण्याच्या मार्गी आहे . सध्याला हा चित्रपट देशांर्गत फार कमी कमाई करत आहे
आलियाच्या सीतेच्या भूमिकेबाबत मोठा प्रश्न उपस्थित : दरम्यान, नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूर 'राम' आणि आलिया भट्ट 'सीता'ची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर येत आहे. या चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी केजीएफ स्टार यशचे नाव समोर आले आणि त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला आहे. आता रामानंद सागरच्या रामायण (1988) मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारा अभिनेता सुनील लाहिरीने आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार याबाबत एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.