मुंबई- Aryan Khan turns 26 : सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांची मुलं सुहाना खान आणि आर्यन खान यांच्यातील भाऊ बहिणींचं नातं खूप सुंदर आहे. 12 नोव्हेंबर रोजी आर्यनच्या 26 व्या वाढदिवसानिमित्त सुहानानं त्याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या. त्याचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी तिनं आर्यनसोबतच्या तिच्या नॉस्टॅल्जिक फोटोसह एक मनापासून लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.
सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मागील वर्षातील तिच्या आठवणीतील एक फोटो पुन्हा पोस्ट केलाय. फोटोत ती तिचा मोठा भाऊ आर्यन खानच्या शेजारी बसलेली दिसत आहे. आवडत्या श्वानासोबतच्या या फोटोत मोकळेपणाने हसत दोघेही कॅमेऱ्याला लूक देताना दिसतात. ''सुहानानं 12 नोव्हेंबर 2022 च्या आठवणींना उजाळा देताना माझ्या 'बिग ब्रदर आणि बेस्ट फ्रेंड'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा'', असं कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या.
सुहानाला नाटकांची आवड आहे. अनेक नाटकांमध्ये सहभागी झाल्यानंतर ती आता झोया अख्तरनं दिग्दर्शित केलेल्या द आर्चीज चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या लोकप्रिय कॉमिक मालिकेची भारतीय आवृत्ती आहेय या चित्रपटात खुशी कपूर, अगस्त्य नंदा, मिहिर आहुजा, युवराज मेंडा, डॉट आणि वेदांग रैना देखील आहेत. हा सिनेमा या वर्षी ७ डिसेंबरला रिलीज होणार आहे.
दरम्यान आर्यनला अभिनयापेक्षा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अधिक रस आहे. त्यानं कभी खुशी कभी गम या चित्रपटात शाहरुखच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. 'द लायन किंग'मधील द इनक्रेडिबल्स आणि सिम्बाच्या हिंदी डबसाठीही त्यांनं आपला व्हाईस ओव्हर दिला आहे. तो सध्या स्टारडम नावाच्या ओटीटी मालिकेचा दिग्दर्शक म्हणून काम करत आहे.