महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mumbai schedule for Jawan : शाहरुख आणि नयनताराच्या जवानचे मुंबईतील शुटिंग पूर्ण, टीम राजस्थानसाठी होणार रवाना - टीम राजस्थानसाठी होणार रवाना

सुपरस्टार शाहरुख खान आणि नयनतारा यांनी त्यांच्या आगामी 'जवान' चित्रपटासाठी मुंबईत नऊ दिवसांच्या शेड्यूलमध्ये काही महत्त्वाची दृश्ये शूट केली. अ‍ॅटली आणि टीम लवकरच पुढील शुटिंगसाठी राजस्थानला रवाना होणार आहेत.

शाहरुख आणि नयनतारा
शाहरुख आणि नयनतारा

By

Published : Mar 8, 2023, 2:35 PM IST

मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे. अ‍ॅटली कुमार यांच्या नेतृत्वाखालील चित्रपटाच्या टीमने नुकतेच मुंबईत नऊ दिवसांचे वेळापत्रक पूर्ण केले. यासाठी नुकतीच आई बनलेली तमिळ सुपरस्टार नयनतारा मुंबईत टीममध्ये शुटिंगसाठी सामील झाली होती.

मुंबईत एका आठवड्यापेक्षा जास्त दिवसांचे वेळापत्रक ठरले होते. याकाळात टीमने किंग खान शाहरुख आणि नयनतारा यांचे एकत्रीत काही सीन्स शूट केले. यादरम्यान शाहरुख आणि नयनताराची उत्कृष्ट केमेस्ट्री पाहायला मिळाल्याने लेडी सुपरस्टार नयनताराला अतिशय चांगला अनुभव आला. यानंतर नयनतारा तामिळनाडूमध्ये घरी रवाना झाली आहे आणि लवकरच ती राजस्थानमधील वेळापत्रकासाठी सेटवर परतणार आहे. त्याच्या तारखा अद्याप लॉक करायच्या आहेत परंतु निर्माते लवकरच जवान शूटसाठी राजस्थानला जाणार आहेत.

जवान हा चित्रपट दक्षिण आणि बॉलीवूडमधील एक प्रचंड टॅलेंट क्रॉसओवर आहे. शाहरुख आणि नयनतारा यांच्या शिवाय जवान चित्रपटात प्रशंसित तमिळ स्टार विजय सेतुपती देखील विरोधी भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट शाहरुखच्या फिल्मोग्राफीमध्ये देखील खास राहील कारण त्याने तीन दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेल्या त्याच्या कारकिर्दीत प्रथमच दक्षिणेकडील दिग्दर्शकाशी हातमिळवणी केली आहे. अ‍ॅटलीला देखील शाहरुखच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्याने दावा केला आहे की तो सुपरस्टारला कधीही न पाहिलेल्या अवतारात प्रोजेक्ट करेल. शाहरउखचा पठाण हा चित्रपट हिट झाल्यामुळे त्याने पुन्हा एकदा आपले गतवैभव मिळवले आहे. त्यालाही जवान आणि त्यानंतर रिलीज होणारा डंकी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

अ‍ॅटली द्वारे लिखित आणि दिग्दर्शित, जवान हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाने सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि किंग खानच्या फर्स्ट लूकने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे. जवान या चित्रपटाचे 2021 मध्ये शुटिंग सुरू झाले होते आणि हा चित्रपट 2 जून 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा -Kangana Ranaut Celebrates Holi : 'चंद्रमुखी २' च्या सेटवर कंगना रणौतने साजरी केली होळी

ABOUT THE AUTHOR

...view details